Sunny Leone: तू असे कपडे का घातले...; सनी लिओनीचा ग्लॅमरस लूक बघून चिडला 'हा' खास व्यक्ती

Sunny Leone Fashion: बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या मुलांच्या फॅशनविषयक प्रतिक्रिया शेअर केल्या.
Sunny Leone Fashion
Sunny Leone FashionSaam Tv
Published On

Sunny Leone Fashion: बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या मुलांच्या फॅशनविषयक प्रतिक्रिया शेअर केल्या. तीने सांगितले की, तिचे मुलगे आशेर आणि नोआ सहसा तिच्या कपड्यांवर काहीही टिप्पणी करत नाहीत, परंतु जेव्हा ती लो-कट गाउन घालते किंवा ग्लॅमरस मेकअप करते, तेव्हा ते तिला प्रश्न विचारतात. ते म्हणतात, "आई, मला वाटत नाही की हे छान आहे... तू असे कपडे का घातले आहेस?" त्यांना तिचा स्मोकी आय मेकअप आणि रेड कार्पेट लुक विशेषतः खटकतो.

सनीने पुढे सांगितले की, तिच्या मुलांना ती 'मॉम-मोड'मध्ये जास्त आवडते, म्हणजेच साध्या आणि नैसर्गिक लुकमध्ये. तथापि, जेव्हा ती त्यांना विचारते, "मी सुंदर दिसते का?" तेव्हा ते नेहमीच "हो" असे उत्तर देतात, जे तिला खूप गोड वाटते. तिच्या मते, मुलांच्या या प्रामाणिक प्रतिक्रियेमुळे तिच्या फॅशनवर एक वेगळा परिणाम झाला आहे.

Sunny Leone Fashion
Deepika Padukone: 'मी माझ्या निर्णयांवर ठाम...; 'स्पिरिट' चित्रपटाच्या वादावर दीपिका पदुकोण स्पष्टच बोलली

तीच्या मुलीबद्दल बोलताना सनीने सांगितले की, निशा खूपच शांत स्वभावाची आहे आणि ती तिच्या कपड्यांवर किंवा मेकअपवर कधीच काही म्हणत नाही. तीने हेही नमूद केले की, तिचा मुलगा नोआ तीनही मुलांमध्ये सर्वात स्टायलिश आहे. तो त्याच्या मोज्यांपासून टोपीपर्यंत सर्व काही मॅचिंग घालतो आणि त्याला कपडे घालण्यासाठी कधीच मदतीची गरज भासत नाही.

Sunny Leone Fashion
Tara Sutaria: तारा सुतारिया पुन्हा प्रेमात? 'या' महाराष्ट्राच्या लाडक्या बॉलिवूड अभिनेत्याला करतेय डेट

सनी लिओनीने तिच्या कुटुंबातील या गोड क्षणांची माहिती देताना सांगितले की, तिच्या मुलांच्या या प्रतिक्रिया तिला खूप आनंद देतात. तिच्या मते, मुलांच्या प्रामाणिक प्रतिक्रियेमुळे ती स्वतःच्या फॅशन निवडींबद्दल अधिक काळजी घेते आणि त्यांच्यासोबतचा हा संवाद तिच्या आयुष्यातील एक खास क्षण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com