Suraj Chavan saam tv
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan : सूरज चव्हाणला व्हायचंय साऊथचा हिरो; 'पुष्पा'सोबत चित्रपट करणार? सांगितलं अल्लू अर्जुनसोबत काम करण्याचं प्लानिंग

Suraj Chavan - Allu Arjun : 'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाणने साऊथमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याला अल्लू अर्जुनसोबत काम करायचे आहे.

Shreya Maskar

सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी 5' चा विजेता ठरला.

सूरज चव्हाणला साऊथ इंडस्ट्रीत काम करायचे आहे.

सूरजला अल्लू अर्जुनसोबत चित्रपट करायचा आहे.

'झापुक झूपूक' चित्रपटाचा हिरो सूरच चव्हाण त्याच्या हटके अंदाजासाठी ओळखला जातो. 'झापुक झूपूक' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर इतक यश मिळाले नाही मात्र सूरजच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले. 'बिग बॉस मराठी 5'मुळे सूरज चव्हाण खूप लोकप्रिय झाला. तो बिग बॉसचा विजेता ठरला. त्याने केदार शिंदे यांच्यासोबत पहिला चित्रपट केला. त्यानंतर स्वतःच्या नवीन घरात प्रवेश केला आणि थाटामाटात बोहल्यावर चढला. बिग बॉसनंतर सूरजने कधी पाठी वळून पाहिले नाही. आता सूरजने आपले भविष्यातील प्लान सांगितले आहेत.

'बिग बॉस मराठी 5'नंतर सूरज चव्हाण कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. नुकतीच त्याने एका मिडिया मुलाखतीत साऊथ इंडस्ट्रीत काम करायची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच त्याने त्याचा आवडता साऊथ अभिनेता देखील सांगितला आहे. हॉट सीट टॉक्स या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सूरज चव्हाण म्हणाला की, "मला साऊथ इंडस्ट्रीत काम करायचे आहे आणि ते मी नक्कीच करणार. मला दाक्षिणात्य इंडस्ट्री खूप आवडते. त्यांच्या चित्रपटातील अॅक्शन मला आवडते."

मुलाखतीत सूरज पुढे बोलला की, "मी साऊथ चित्रपटात अॅक्शन पाहतो आणि तशी अॅक्शन मी केली आहे. सूरज चव्हाण म्हणजे वादळ आहे..." आवडत्या अभिनेत्याबद्दल सूरज म्हणाला की, "मला अल्लू अर्जुन हा खूप आवडतो. माल त्याच्यासोबत काम कारायचे आहे. त्याचे चित्रपट वेगळे असतात. तो एकच चित्रपट करतो, पण भारी करतो. तसे माझे पण आहे. मी एकदाच काम करतो पण टॉपचे काम करतो. माझा लूक साऊथच्या लोकांसारखा आहे. सयाजी शिंदेंशी संपर्क झाला, त्यांच्याशी माझी ओळख झाली, तर मी साऊथ इंडस्ट्रीत नक्कीच जाईन..."

सूरज चव्हाणचे चाहते आता त्याच्या आगामी चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहे. सूरज आता लवकरच साऊथ इंडस्ट्रीत झळकणार असल्याचे दिसत आहे. भविष्यात सूरज चव्हाण आणि अल्लू अर्जुन खरंच एकत्र काम करतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या सूरज चव्हाण सोशल मीडियावर भन्नाट रील शेअर करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अशोक खरात आणि सनदी अधिकाऱ्यांच्या एकत्रित जागेची आयकर विभागामार्फत चौकशी सुरू

WhatsApp Update: खुशखबर! WhatsApp चॅटींगसाठी फोन नंबरची गरज नाही? वाचा नव्या फीचरची संपूर्ण माहिती

बारामतीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात तगडा उमेदवार मैदानात उतरणार? काँग्रेसच्या बैठकीत काय शिजलं? वाचा

Plane Crash : १२५ सैनिकांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात; ६६ जणांचा मृत्यू

Hair Dandruff Removal Tips: केसांतला कोंडा घालवण्यासाठी घरच्या घरी करा 5 सोपे उपाय

SCROLL FOR NEXT