Manasvi Choudhary
नाश्त्याला कुरकुरीत दाल वडा खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. मात्र अनेकदा हॉटेलसारखा दालवडा घरी बनवता येत नाही अशी महिलांची तक्रार असते.
कुरकुरीत दाल वडा तुम्ही घरी देखील बनवू शकता. अत्यंत सोप्या पद्धतीने दाल वडा तुम्ही बनवू शकता.
दाल वडा बनवण्यासाठी चणा डाळ, कांदा, हिरवी मिरची, आले, कढीपत्ता, कोथिंबीर, हिंग, मीठ, तेल हे साहित्य एकत्र करा.
दालवडा बनवण्यासाठी सर्वातआधी चणा डाळ स्वच्छ धुवून किमान ३ ते ४ तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर त्यातील संपूर्ण पाणी निथळून घ्या
भिजवलेल्या डाळीतील २ चमचे डाळ बाजूला काढून ठेवा. उरलेली डाळ मिक्सरमध्ये पाणी न घालता जाडसर वाटून घ्या. डाळ एकदम बारीक करू नका.
वाटून घेतलेल्या डाळीत बाजूला काढलेली अख्खी डाळ, चिरलेला कांदा, मिरची, आले, कढीपत्ता, हिंग आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
हाताला थोडे तेल लावून मिश्रणाचे छोटे गोळे करा आणि तळहातावर ठेवून चपटे वडे थापून घ्या. कडा फार जाड ठेवू नका.
कढईत तेल मध्यम गरम करा. वडे तेलात सोडून मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.