Manasvi Choudhary
केस धुण्यापूर्वी केसांची काळजी घेणे महत्वाचे आहे. सिल्की आणि शायनी केसांसाठी केस धुण्याआधी त्यांना हेअर मासक लावणे महत्वाचे आहे.
केमिकलयुक्त प्रोडक्ट्सपेक्षा तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्तीने हेअर मास्क तयार करून केसांना लावू शकता.
दही आणि मध याचे एकत्रित मिश्रण करून ती पेस्ट तुम्ही केसांना लावा यामुळे केसांना नैसर्गिकरित्या कंडिशनिंग मिळेल केस सॉफ्ट होतील.
कोरफड आणि गरम तेल एकत्र करून हे देखील केसांना लावा यामुळे केसांची वाढ लवकर होईल.
हेअर मास्क कोरड्या केसांवर लावण्याऐवजी थोडे पाणी शिंपडून केस ओले करा. यामुळे मास्क केसांमध्ये व्यवस्थित शोषला जातो.
हेअर मास्क लावताना तो टाळूला आणि केसांच्या टोकांना नीट लावावा म्हणजे केसांना फायदा होईल.
हेअर मास्क लावल्यानंतर ५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा, ज्यामुळे डोक्याचे रक्ताभिसरण वाढते.
घरगुती मास्क किमान २० ते ३० मिनिटे ठेवावा. त्यापेक्षा जास्त वेळ ठेवल्यास केस कडक होऊ शकतात.
हेअर मास्क लावल्यानंतर केस धुण्यासाठी अति गरम पाण्याचा वापर करू नका कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा.