Manasvi Choudhary
उन्हाळ्यात आंबा खाण्याची मज्जा काहीशी वेगळी असते.
आंबा खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढते यामुळे आंबा खाताना काही चुका करणे टाळावे अन्यथा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
आंबा खाण्यापूर्वी किमान १ ते २ तास थंड पाण्यात भिजवून ठेवावा. आंब्यामध्ये नैसर्गिक उष्णता असते. जर तुम्ही आंबा न भिजवता खाल्ला तर शरीरात उष्णता वाढून पुरळ, मुरुमे किंवा पचनाचे त्रास होऊ शकतात.
आयुर्वेदानुसार, आंबा आणि दूध यांचे दूध एकत्र केल्यास पोटाचे विकार होऊ शकतात.
रात्री उशिरा आंबा खाल्ल्याने पचनक्रियेत अडथळा येतो यामुळे झोपेत अडथळा येऊ शकतो. तसेच वजन वाढण्याची शक्यता असते.
आंबा गोड असल्याने त्यात कॅलरीज आणि साखर जास्त असते. दिवसातून १ पेक्षा जास्त आंबा खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते यामुळे मधुमेह होऊ शकतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.