आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २'ने जगभरात 800 कोटींचा टप्पा पार केला.
'धुरंधर 2' चित्रपट 19 मार्च 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला.
रणवीर सिंहच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंहच्या 'धुरंधर 2'चे बॉक्स ऑफिसवर तुफान पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने ५ दिवसांत जगभरात 800 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट 19 मार्च 2026 ला रिलीज झाला आहे. 'धुरंधर 2'च्या कथेत रहमान डकैतच्या मृत्यूनंतर पुढे काय घडते, हे दाखवण्यात आले आहे. 'धुरंधर 2'ने रिलीजच्या पहिल्या सोमवारी किती कोटी कमावले, जाणून घेऊयात.
रणवीर सिंहच्या 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपटाने भारतात ५०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. एकूण (Gross) कमाई ६०० कोटी आणि जगभरातील कमाई ८०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. 'धुरंधर 2' बॉलिवूडचा एक नवीन 'ब्लॉकबस्टर' ठरला आहे. पहिल्या सोमवारी भारतातील कमाईमध्ये ४० टक्क्यांहून अधिक घट दिसून आली.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, सोमवार, २३ मार्च २०२६ रोजी 'धुरंधर २' च्या भारतातील कमाईत ४० टक्क्यांहून अधिक घट दिसून आली. Sacnilk च्या माहितीनुसार, रणवीर सिंगची मुख्य भूमिकेत असलेल्या चित्रपटाने २०,३८२ शोजमधून ६५ कोटी रुपयांची कमाई केली. 'धुरंधर २' हा चित्रपट केवळ एक किंवा दोन नव्हे तर पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला. ज्यामध्ये हिंदी, कन्नड, मल्याळम, तमिळ आणि तेलुगू या भाषांचा समावेश आहे. सोमवारी, या चित्रपटाने हिंदी भाषेत ६० कोटी रुपयांची कमाई केली, तर कन्नड भाषेने कलेक्शनमध्ये ०.१५ कोटी रुपयांची भर घातली आणि मल्याळम भाषेत एकूण कमाईत ०.१५ कोटी रुपये कमावले. तमिळ आवृत्तीने सोमवारी १.२० कोटी रुपयांची कमाई केली, तर तेलुगू आवृत्तीचे कलेक्शन ३.५० कोटी रुपये इतके कलेक्शन केले.
चित्रपटाचे भारतातील एकूण (Net) कलेक्शन ५१९.१२ कोटी रुपये, तर Gross कलेक्शन ६१९.७६ कोटी रुपये झाले आहे. याव्यतिरिक्त, परदेशातील कलेक्शन २१० कोटी रुपये इतके असून, यामुळे 'धुरंधर २' चे सर्व भाषांमधील जगभरातील एकूण कलेक्शन ८२९.७६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
'धुरंधर 2' चित्रपटाने ओपनिंग बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत 'पठाण,' 'जवान,' 'केजीएफ २,' आणि 'आरआरआर' यांसारख्या अनेक मोठ्या हिंदी आणि पॅन-इंडिया चित्रपटांना मागे टाकले आहे. 'धुरंधर 2' हा रणवीर सिंहचा जगभरातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर ८ बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकले आहे, यात संजू (५४१.७६ कोटी), पद्मावत (५६० कोटी), टायगर जिंदा है (५६२.१२ कोटी), सैयारा (५७०.६७ कोटी), केजीएफ चॅप्टर २ हिंदी (५८३.८५ कोटी), सुलतान (५८९ कोटी), धूम ३ (६०१ कोटी), आणि गदर २ (६८५.१९ कोटी) या चित्रपटांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.