Arjun Rampal: २६/११ चा थरार! अर्जुन रामपालने सांगितला खळबळजनक अनुभव; 'धुरंधर'ने दिली बदला घेण्याची संधी?

Arjun Rampal: 'धुरंधर: द रिव्हेंज' फेम अर्जुन रामपालने एक विधान प्रेक्षकांची मने जिंकत आहे. त्याने 'धुरंधर' हा दहशतवाद्यांविरुद्ध घेतलेला बदला असे म्हठले असून, त्याने २६/११ च्या हल्ल्यांविषयीचा त्याचा अनुभव शेअर केला आहे.
Arjun Rampal
Arjun RampalSaam Tv
Published On

Arjun Rampal: आदित्य धर यांचा 'धुरंधर' हा चित्रपट गेल्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील (२६/११) भयानक सीन या चित्रपटात पडद्यावर हुबेहूब साकारून, या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आणि त्यांना खोलवर हादरवून सोडले. आता, 'धुरंधर २' हा चित्रपटही चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत असून, भारतीय प्रेक्षकांकडून त्याचे भरभरुन कौतुक केले जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान, चित्रपटातील मुख्य अभिनेता अर्जुन रामपालने २६/११ च्या भयानक रात्रीचा आपल्या भितीदायक अनुभव प्रेक्षकांना सांगितला. त्याने सांगितले की, 'धुरंधर' चित्रपटात काम करणे ही त्याच्यासाठी केवळ एक व्यावसायिक जबाबदारी नव्हती, तर वैयक्तिक सूड उगवण्यासाठी केलेला चित्रपट आहे.

२६/११ ची ती भयानक रात्र आणि अर्जुनच्या आठवणी

त्या भयानक रात्रीची आठवण सांगताना अर्जुन रामपाल म्हणाला की, २००८ मध्ये जेव्हा मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता तेव्हा तो आपल्या मित्रांसोबत आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी 'ताज हॉटेल'ला जाणार होता. त्याने सांगितले, "मी माझ्या मित्रांना सोबत एका हॉटेलमध्ये नुकताच पोहोचलो होतो, तेवढ्यात माहीमजवळ पहिला स्फोट झाला. तो स्फोट इतका मोठा होता की, हॉटेलच्या खिडक्यांच्या काचा थरथरू लागल्या. आम्हाला सुरुवातीला वाटले की कदाचित कुलाबामध्ये गँग वॉर सुरु झाली असावा. परंतु त्यानंतरच्या २० ते ३० मिनिटांतच संपूर्ण परिसर मिलिटरी झोनमध्ये चेंज झाला आणि सुरक्षेच्या कारणास्तव आम्हाला हॉटेलबाहेर पडू नये असे सांगण्यात आले." अर्जुनने सांगितले की, आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने दूरदर्शनवर त्या भयानक घटनांचे थेट प्रक्षेपण पाहिले. ती दृश्ये आजही विसरणे अशक्य आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी, जेव्हा तो आपल्या घरी परतत होता, तेव्हा वाटेत अनेकदा त्याला थांबावे लागले. कारण त्या घटनेच्या धक्क्याने मी पूर्णपणे सुन्न झालो होता.

Arjun Rampal
Nora Fatehi: नोरा फतेहीच्या अडचणीत वाढ; वर्क परमिट होणार रद्द, भारतातून केलं जाणार हद्दपार?

मेजर इक्बाल आणि 'धुरंधर'च्या माध्यमातून घेतलेला सूड

'धुरंधर' या चित्रपटात अर्जुन रामपालने 'आयएसआय'चा (ISI) मेजर इक्बाल ही भूमिका साकारली आहे. हा इक्बाल त्या दहशतवादी हल्ल्यांमागील प्रमुख सूत्रधारांपैकी एक होता. चित्रपटात, त्याचे पात्र अशा प्रकारे चित्रित करण्यात आले आहे की, जेव्हा 'ताज हॉटेल'च्या आत दहशतवादी निष्पाप लोकांचे रक्त सांडत होते, तेव्हा हा इक्बाल मात्र बाहेर बसून त्याचा आनंद साजरा करत होता. अर्जुन म्हणाला, "जेव्हा आदित्य धरने मला २६/११ च्या त्या प्रसंगाचा सिक्वेन्स ऐकवला, तेव्हा मला मनापासून वाटले की, त्या घटनेचा सूड उगवण्याची हीच माझ्यासाठी योग्य संधी आहे. ती नकारात्मक भूमिका साकारताना, माझ्या आत अनेक वर्षांपासून दडलेली द्वेष आणि क्रोधाची भावना मी बाहेर काढून टाकली. शेवटी, मी फक्त एवढेच म्हणेन, 'भारत माता की जय!

Arjun Rampal
Dhurandhar 2: 'धुरंधर 2' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, रणवीर सिंग विरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'ची त्सुनामी

आदित्य धर यांच्या या धुरंधर २ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. जिथे या मालिकेच्या पहिल्या भागाने जगभरात तब्बल १,३०० कोटींची प्रचंड कमाई केली होती, तिथे धुरंधर २ ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १४५ कोटींची कमाई केली. अवघ्या चार दिवसांतच, या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ४५० कोटींचा आणि जागतिक स्तरावर ७५० कोटींचा टप्पा पार केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com