Dhurandhar 2 : रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना, ३ दिवसांत ३०० कोटीपार कमाई

Dhurandhar The Revenge - Box Office Collection Day 3 : रणवीर सिंगच्या 'धुरंधर 2'ने 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाने तिसऱ्या दिवशी किती कमावले , जाणून घेऊयात.
Dhurandhar The Revenge - Box Office Collection Day 3
Dhurandhar 2saam tv
Published On
Summary

'धुरंधर 2' चित्रपट 19 मार्च 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला.

'धुरंधर 2' ने तीन दिवसांत 300 कोटींचा टप्पा ओलांडला.

'धुरंधर 2' आदित्य धर दिग्दर्शित आहे.

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर 2' म्हणजेच 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट 19 मार्च 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट जगभरात धुमाकूळ घालत आहे. 'धुरंधर 2' हा एक जबरदस्त ॲक्शन चित्रपट असून यात रहमान डकैतच्या मृत्यूनंतर पुढे काय घडते, हे दाखवण्यात आले आहे. ही कथा भारताचा गुप्तहेर असलेल्या आणि पूर्वी 'जसकीरत सिंह रंगी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हमझा अली माझारीच्या प्रवासाची आहे. चित्रपटाने तीन दिवसांत 300 कोटी पार कमाई केली आहे.

'धुरंधर: द रिव्हेंज' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 3

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'धुरंधर: द रिव्हेंज'ने तिसऱ्या दिवशी 113 कोटी रुपयांची (net collection) कमाई केली आहे. चित्रपटाचे जवळपास 20,822 शो पार पडले. अशाप्रकारे चित्रपटाची तीन दिवसांत एकूण कमाई 339 कोटी रुपये झाली आहे. तसेच चित्रपटाचे (Gross collection) 402.75 कोटी रुपये झाले.

  • ॲडव्हान्स बुकिंग - 43 कोटी रुपये

  • दिवस पहिला - 102.55 कोटी रुपये

  • दिवस दुसरा - 80.72 कोटी रुपये

  • दिवस तिसरा - 113 कोटी रुपये

  • एकूण - 339 कोटी रुपये

तिसऱ्या दिवसाचे भाषेनुसार कलेक्शन

  • हिंदी - 103.44 कोटी रुपये

  • तमिळ - 3.23 कोटी रुपये

  • तेलगु - 6.35 कोटी रुपये

धुरंधर

'धुरंधर' 5 डिसेंबर 2025 रिलीज झाला होता. रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या या स्पाय-थ्रिलरला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. 'धुरंधर' चित्रपटात रणवीर सिंगसोबत सारा अर्जुन, सारा अर्जुन, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना हे कलाकार झळकले. या चित्रपटात अक्षय खन्नाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.

Dhurandhar The Revenge - Box Office Collection Day 3
Bigg Boss Marathi 6 : प्रेक्षकांचे मन जिंकण्यास 'हा' सदस्य अपयशी, भाऊच्या धक्क्यावर घेणार घराचा निरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com