Bigg Boss Marathi 6 : प्रेक्षकांचे मन जिंकण्यास 'हा' सदस्य अपयशी, भाऊच्या धक्क्यावर घेणार घराचा निरोप

Bigg Boss Marathi 6 Elimination : 'बिग बॉस मराठी 6' सध्या चांगलेच चर्चेत आहे. वाइल्ड कार्ड स्पर्धकांनी घरात धुमाकूळ घातला आहे. मात्र आता एका वाइल्ड कार्ड स्पर्धकाचा प्रवास थांबणार असल्याचे बोले जात आहे.
Bigg Boss Marathi 6 Elimination
Bigg Boss Marathi 6 SAAM TV
Published On
Summary

बिग बॉसमध्ये या आठवड्यात सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

घरातून एक वाइल्ड कार्ड स्पर्धक बाहेर पडणार आहे.

भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख तन्वी आणि सागरचे कौतुक करतो.

'बिग बॉस मराठी 6' च्या घरात या आठवड्यात संकेत पाठक घराचा कॅप्टन होता. ज्यामुळे तो सुरक्षित आहे. नुकताच बिग बॉसच्या घरात गुढीपाडव्याचा सण थाटामाटात साजरा केला गेला. घरात रोज नवीन राडा पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस मराठी 6' ची ट्रॉफी उचलण्यासाठी सदस्यांमध्ये तगडी टक्कर पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस मराठी 6'च्या दहाव्या आठवड्यात एकूण 7 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यांची नावे खालील प्रमाणे-

नॉमिनेट सदस्यांची नावे

  • विशाल कोटियन

  • संस्कृती साळुंके

  • सागर कारंडे

  • रेवा कौरासे

  • प्रभू शेळके

  • राकेश बापट

  • दिपाली सय्यद

मीडिया रिपोर्टनुसार, बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात वाइल्ड कार्ड स्पर्धक संस्कृती साळुंके घराचा निरोप घेणार आहे. या आठवड्यात संस्कृतीने अनुश्री आणि प्रभूसोबत मोठे भांडण केले. प्रेक्षकांचे मन जिंकण्यास संस्कृती साळुंके अपयशी ठरली. त्यामुळे कमी मते मिळाल्यामुळे संस्कृती साळुंकेची बिग बॉसच्या घरातून एक्झिट होणार आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. याचा उलगडा आज भाऊच्या धक्क्यावरच होईल.

संस्कृती साळुंकेन आजवर अनेक रिअ‍ॅलिटी शो केले आहेत. ती 'जाऊ बाई गावात' या मराठी रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात सहभागी झाली होती. शेवटी Danger झोनमध्ये दिपाली सय्यद आणि संस्कृती साळुंके दिसतात.

भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख संकेत पाठक आणि राखी सावंत यांची चांगलीच शाळा घेतात. तसेच राखी सावंतला संपूर्ण सीझनसाठी शिक्षा देखील दिली जाणार आहे. पुढच्या आठवड्याचा कॅप्टन विशाल कोटियन झाला आहे. आता घरातून नेमकं कोण जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळतो.

Bigg Boss Marathi 6 Elimination
Monalisa : लग्नानंतर 'मोनालीसा'ला मिळाली जीवे मारण्याची धमकी, नवऱ्यासोबत VIDEO शेअर करत मागितली मदत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com