Director Death: 'डोरेमोन'चे दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; फुफ्फुसाच्या कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

Director Death: ॲनिमेशन विश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. डोरेमॉनला (Doraemon) एक आगळीवेगळी ओळख मिळवून देणारे प्रख्यात दिग्दर्शक त्सुतोमु शिबायमा यांचे निधन झाले आहे.
Doraemon Director Shibayama Tsutomu passes away
Doraemon Director Shibayama Tsutomu passes awaySaam Tv
Published On

Director Death: लहान मुलांचे आवडते कार्टून 'डोरेमोन' ज्यांनी अजरामर केले असे दिग्दर्शक त्सुतोमु शिबायमा यांचे निधन झाले आहे. त्यांनी जवळपास २० वर्षे या कार्टून मालिकेचे दिग्दर्शन केले आणि या काळात, 'डोरेमोन' फ्रँचायझीला अनेक उत्कृष्ट चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले.

फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे निधन

६ मार्च २०२६ रोजी फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले. ही बातमी १७ मार्च रोजी 'अजिया-दो ॲनिमेशन वर्क्स' (Ajia-do Animation Works) या त्यांच्या स्टुडिओद्वारे जाहीर करण्यात आली. त्यांच्या कुटुंबाच्या इच्छेनुसार, त्यांचे अंत्यसंस्कार यापूर्वीच खाजगीरित्या पार पडले होते.

Doraemon Director Shibayama Tsutomu passes away
Super Duperr Movie: एक फ्लॅट, दोन कुटुंब...; निर्मिती सांवत आणि च्या 'सुपर डुपर'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

२० वर्षे 'डोरेमोन' मालिकेचे दिग्दर्शन

जपानमध्ये त्सुतोमु शिबायमा यांना "राष्ट्रीय ॲनिमेशनचे जनक" (Father of National Animation) म्हणून ओळखले जात होते. त्यांनी सुमारे २० वर्षे 'डोरेमोन'ची धुरा सांभाळली आणि या मालिकेला प्रत्येक पिढीच्या मनामनात स्थान मिळवून दिले. १९७९ मध्ये त्यांनी 'डोरेमोन' टीव्ही मालिकेचे दिग्दर्शन केले आणि त्यानंतर या फ्रँचायझीच्या २२ चित्रपटांचेही दिग्दर्शन केले.

Doraemon Director Shibayama Tsutomu passes away
Dhurandhar 2 : बडे साहेबांना पाहून बसेल 440 होल्टचा धक्का, चाहते म्हणाले- हे तर मरे साहब| VIDEO

त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात

त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९६३ मध्ये 'तोई ॲनिमेशन' (Toei Animation) येथे झाली. त्यानंतर, त्यांनी 'शिन-ई ॲनिमेशन' (Shin-Ei Animation) सोबत काम केले. 'डोरेमोन' व्यतिरिक्त, त्यांनी 'लुपिन III' (Lupin III) आणि 'चिबी मारुको-चान' (Chibi Maruko-chan) सारख्या इतर अनेक गाजलेल्या प्रकल्पांमध्येही योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण ॲनिमेशन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com