Suraj Chavan saam tv
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan : "आपला सूरज लवकरच बाबा होणार..."; आत्याबाईंचा आनंद गगनात मावेना, जान्हवी किल्लेकरने VIDEO शेअर करून दिली गुडन्यूज

Suraj Chavan - Sanjana Pregnancy Announcement : 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार आहे. जान्हवी किल्लेकरने व्हिडीओ शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे.

Shreya Maskar

सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार

जान्हवी किल्लेकरने भरली सूरजच्या बायकोची चोरओटी

जान्हवी किल्लेकरने शेअर केला खास क्षणाचा व्हिडीओ

'बिग बॉस मराठी ५' चा विजेता गुलीगत किंग सूरज चव्हाणच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. अखेर सूरजची मानलेली बहीण म्हणजे अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने एक खास व्हिडीओ शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. काही महिन्यांपासून सूरजची पत्नी संजना गरोदर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. संजनाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले होते. आता अखेर जान्हवीने चोरओटी भरतानाचा व्हिडीओ शेअर करून गुडन्यूज दिली आहे.

जान्हवी अलिकडेच सूरजला भेटायला त्याच्या घरी गेली होती. तेव्हा तिने एक व्हिडीओ शेअर केला होता, त्यात संजनाचा बेबी बंप स्पष्ट दिसला आणि पुन्हा सूरज चव्हाण बाबा होणार असल्याची चर्चा रंगली. अशात आता अखेर जान्हवीने व्हिडीओ शेअर करून ही आनंदाची बातमी Confirmed केली.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जान्हवी संजना आणि सूरजला ओवाळताना दिसत आहे. तिने संजनाची चोरओटी भरली. दोघांना भरपूर आशीर्वाद दिले. भेटवस्तू दिली. तसेच जान्हवीने सूरज- संजनाला प्रेमाने मिठी देखील मारली. जान्हवीने मार्च महिन्यात सूरजच्या बायकोची चोरओटी भरली. जान्हवी किल्लेकरने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "मार्च महिन्यात भरलेल्या चोर ओटीचा व्हिडीओ आत्ता शेअर करतेय, कारण आत्ता Confirmed सांगायला काहीच हरकत नाही की, आपला सूरज लवकरच "बाबा " होणारे..."

जान्हवी किल्लेकरच्या व्हिडीओवर चाहते कमेंट्स आणि प्रेमाचा वर्षाव करत आहे. एकीकडे सूरज आणि संजनाला नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत, संजनासाठी काळजी व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे सूरज-जान्हवीच्या भाऊ-बहिणीच्या नात्याचे कौतुक करत आहे. जान्हवीची पदोपदी सूरजला दिलेली साथ पाहून चाहते भारावून गेले आहेत. गुलीगत किंग सूरज चव्हाण आणि संजनाने २९ नोव्हेंबर २०२५ लग्नगाठ बांधली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : भावोजीच्या प्रेमात आकंठ बुडाली विवाहित मेहुणी; स्वतःच्याच बहिणीच्या हत्येचा रचला कट, पण स्वतःच गमावला जीव

200 कोटींचा कर्ज घोटाळा, ईडीचे एकाचवेळी 17 ठिकाणी छापे; मुंबई-दिल्लीत खळबळ

Maharashtra News Live Update: केज तालुक्यातील टाकळी येथील घुले कुटुंबाचे आंदोलन स्थगित

सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला मिळाली 35 कोटींची ऑफर; सरकार पाडण्याचा होता कट? राजकीय वर्तुळात खळबळ

Hair Care: घामामुळे केसांमध्ये खूप खाज येतेय? आत्ताच बदला या 3 सवयी मिळेल रातोरात आराम

SCROLL FOR NEXT