Suraj Chavan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan : तुज्या पिरतीचा तोरा...; 'गावरान मुंडा' सूरज रमलाय गावच्या शेतात, पाहा VIDEO

Suraj Chavan New Reel : 'बिग बॉस मराठी 5' विजेता सूरज चव्हाणने एक नवीन रील शेअर केला आहे. त्याच्या या रीलवर चाहत्यांच्या भरपूर कमेंट्स येत आहेत.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5'चा (Bigg Boss Marathi 5) विजेता सूरज चव्हाण झाला. महाराष्ट्राने त्याला भरभरून प्रेम दिले आहे. झापुक झुपूक म्हणतं गुलीगत सूरजने बाजी मारली. बिग बॉसमुळे सूरजचा चाहता वर्ग वाढला आहे. लवकरच सूरजचे घर बनणार आहे. सूरजचे इंस्टाग्रामवर भरपूर चाहते आहेत. त्याचे 2.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.

सूरजने नुकतीच आपल्या सोशल मीडियावर एक रील शेअर केली आहे. या रीलला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. सूरज चव्हाणने 'तुज्या पिरतीचा तोरा...' या गाण्यावर शेतात डान्स केला आहे. तो शेतात फेरफटका मारताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये सूरज ट्रॅक्टर चालवत आहे. चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पाडला आहे. एका यूजरने कमेंटमध्ये 'गावरान मुंडे' असे लिहिलं आहे. तर दुसऱ्या युजरने 'हिरो वाटतो सूरज दादा' असे म्हटलं आहे.

सूरज मोढवे गावचा राहणार आहे. बिग बॉसच्या घरात सूरजच्या डायलॉगबाजीने सर्वांचे मन जिंकले. त्याचा साधाभोळा स्वभाव महाराष्ट्राला खूप भावला. गरिबीतून सूरजने एवढे मोठे यश संपादन केले आहे. खेडेगावात राहणारा सूरज आता स्टार बनला आहे. सूरजला आधीपासूनच आपण बिग बॉस विजेता होणार असा आत्मविश्वास होता. नुकतेच सूरजच्या घरचे भूमिपूजन झाले आहे. सूरज जिंकावा हे अवघ्या महाराष्ट्राला वाटत होते. तिने बिग बॉसच्या घरातही छान गेम खेळला होता. बिग बॉसच्या घरात त्याची सर्वांसोबत खूप छान मैत्री झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT