बीड : अवकाळी, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारकडून घोषणा केल्यानंतर देखील मदत पोहचत नाही. यामुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती यासह विविध मागण्यांसाठी बीडच्या परळीमध्ये शेतकऱ्यांचा हक्क मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शेकडो शेतकरी बैलगाडी व ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले आहेत.
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या परळी शहरांमध्ये शेतकऱ्यांनी हा भव्य हक्क मोर्चा काढला आहे. या हक्क मोर्चात शेकडो शेतकरी बैलगाड्या आणि ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले आहेत. हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार आहे. दरम्यान या मोर्चात परळी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे सर्वपक्षीय नेते व (Farmer) शेतकरी सहभागी झाले होते. बैलगाडी व ट्रॅक्टरमवून सहभागी शेतकऱ्यांनी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.
अशा आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या
परळीमध्ये (Parali) काढण्यात आलेल्या हक्क मोर्चातून शेतकऱ्यांनी काढलेल्या पिक विम्याची रक्कम मिळावी. सातबारा कोरा करा, शेतकरी कर्जमुक्त करा, रखडलेला पिक विमा तात्काळ द्या. याशिवाय शेतकऱ्याच्या सोयाबीनला ७ हजार आणि कापसाला १० हजार भाव द्या..या प्रमुख मागण्या घेऊन हा मोर्चा निघाला आहे. तहसील कार्यालयावर मोर्चा नेल्यानंतर याठिकाणी निवेदन देखील देण्यात येणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.