Suraj Chavan Home SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan Home : सूरजच्या लग्जरी बंगल्याची झलक पाहून वेडं लागेल; लग्नाआधी केला गृहप्रवेश-VIDEO

Suraj Chavan New House Griha Pravesh : सूरज चव्हाणने नवीन घरात गृहप्रवेश केला आहे. याचा खास व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सूरजचे नवीन घर पाहा.

Shreya Maskar

बिग बॉस मराठीतून सूरज चव्हाणला खूप लोकप्रियता मिळाली.

सूरजने नवीन घरात गृहप्रवेश केला आहे.

सूरज लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.

'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाणने आपल्या नवीन घरात प्रवेश केला आहे. ज्याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. बिग बॉसमुळे सूरज चव्हाणला (Suraj Chavan) खूप लोकप्रियता मिळाली. सर्वप्रथम सूरजचा 'झापुक झुपूक' ज्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर सूरजने आपल्या लग्नाची आनंदाची बातमी दिली आणि आता सूरज आपल्या नवीन घरात गेला आहे.

सूरजने शेअर केलेल्या व्हिडीओत त्याचे नवीन आलिशान घर पाहायला मिळत आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एक रीलस्टारने कष्ट करून एवढे मोठे यश मिळवले आहेत. सूरज चव्हाण हा बारामती तालुक्यातील मोढवे गावातील रहिवासी आहे. बिग बॉसनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला घर बांधून देणार असं म्हटलं होते. आता वर्षभरात नवीन बंगला तयार झाला आहे.

सूरजने या व्हिडीओला खूप खास कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "आज केला माझ्या नवीन घराचा गृहप्रवेश..." सूरजच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे, त्याचे भरभरून कौतुक केले आहे.

सूरजचे नवीन घर खूपच स्टायलिश आणि मॉडर्न आहे. घरात प्रशस्त खोल्या आहे. मॉड्यूलर किचन आहे. तसेच हिरवागार गार्डनर एरिया आहे. घराचे इंटिरियर लय भारी आहे.कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर आहे. हातात लक्ष्मी देवीचा फोटो घेऊन सूरजने गृहप्रवेश केला. घरात पूजा केली. यावेळी त्याच्या घरातील कुटुंबीय, गावकरी आणि लहान मुलं पाहायला मिळाली.

सूरज चव्हाण लग्न

अलिकडेच सूरज चव्हाणने आपल्या होणाऱ्या बायकोची ओळख करून दिली. सूरजच्या बायकोचे नाव संजना आहे. 29 नोव्हेंबरला सूरज लग्नबंधनात अडकणार आहे. सूरज मामाची मुलीसोबत लग्न करतोय. सूरज चव्हाणच्या लग्नाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : दादरमधील धक्कादायक घटना! बेडरूमच्या बाल्कनीतून उडी मारत महिलेने संपवलं आयुष्य, कारण आलं समोर

Maharashtra Live News Update : देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : कामाचा माणूस हरपला! अजित पवारांना पार्थ पवार यांनी मुखाग्नी दिला, शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

Health Care : दुधाशिवाय भरपूर कॅल्शियम देणारे पदार्थ कोणते? जाणून घ्या

Baramati Places: पुण्यापासून हाकेच्या अंतरावर बारामतीतील या 5 प्रसिद्ध ठिकाणांना द्या भेट

SCROLL FOR NEXT