Bigg Boss 19: सलमान खानच्या अनुपस्थितीत, या आठवड्यातील "वीकेंड का वार" हा कार्यक्रम एका वेगळ्याच थीमवर आधारित होता. स्टेजवर उपस्थित असलेल्या रोहित शेट्टीने या भाग खूपच उत्तम प्रकारे संभाळला. आता या भागात काय होते आणि या आठवड्यात कोणाला बाहेर काढण्यात आले ते जाणून घेऊया.
प्रणित मोरेचे रोहितवर स्टँड-अप
एपिसोडच्या सुरुवातीला, रोहितने स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेला रोहितच्या चित्रपटात बद्दल विचारले. प्रणितने प्रत्येक स्पर्धकाला रोहितच्या चित्रपटातबद्दल मजेदार फॅक्ट सांगितले यामुळे संपूर्ण घरात हास्य फुलले. रोहित स्वतः खूप हसत होता.
फरहानाची टिप्पणी
एका विनोदी खेळादरम्यान, फरहानाला "फ्लॉप फिल्म" सारख्या दिसणाऱ्या स्पर्धकांची नावे द्यावी लागली, जिथे तिने मालती चहर आणि गौरव खन्ना यांचे नाव घेतले. प्रकरण तिथेच संपले नाही. कुनिकाने गौरववर त्याच्या गटबाजी आणि तिच्या मागे बोलण्याचा आरोप केला. तिने त्याला "फत्तू" देखील म्हटले. गौरवने प्रत्युत्तर देत म्हटले की तो कुनिकाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही.
या आठवड्यात कोणाचं एविक्शन होणार नाही
जरी आठ स्पर्धकांना नामांकन मिळाले असले तरी, रोहितने आश्चर्यकारकपणे जाहीर केले की या आठवड्यात कोणलाही बाहेर काढले जाणार नाही. म्हणजे, आता बिग बॉस १९ या शोला त्याचे टॉप 9 स्पर्धक मिळाले आहेत. यामध्ये गौरव, प्रणित, अमल, अशनूर, कुनिका, तान्या, फरहाना, मालती आणि शाहबाज आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.