Bigg Boss Marathi 5 New Promo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Big Boss Marathi 5: बिग बॉस मराठीचा TRP वाढला; भाऊच्या धक्क्याने केली कमाल, वाचा किती रेटिंग मिळालं

Big Boss Marathi TRP: रितेश भाऊंच्या धमाकेदार होस्टींग आणि लयभारी स्टाईलमुळे बिग बॉसने रचला इतिहास. भाऊच्या धक्क्याने केले अनेक रोकॉर्ड ब्रेक.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवसापासून बिग बॉसच्या घरामध्ये सदस्यांचा राडा पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन नव्या ढंगामध्ये आणि नव्या रुपामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनने अगदी काही दिवसांमध्ये रेकॉर्ड ब्रेक करायला सुरुवात केली आहे. बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनमध्ये रितेशभाऊंनी मंच दणाणून सोडला आहे.

बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनमधील रितेश भाऊंच्या लयभारी स्टाईलने अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. बिग बॉसच्या घरातील कल्ला, राडा आणि सदस्यांच्या खेळामुळे सिझनने नवा विक्रम रचला आहे. बिग बॉस मराठी सिझन ५च्या गँड प्रिमियर पासूनच प्रेक्षकांमध्ये क्रेझ पाहायला मिळाली आहे. अगदी लहानमुलांपासून ते मोठ्यांपर्यांत सर्वांनाचं बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनने वेड लावलं आहे.

बिग बॉस मराठीमधील रितेश देशमुखच्या जबरदस्त होस्टिंगने चाहत्यांमध्ये क्रेझ निर्माण झाली आहे. रितेश भाऊ प्रत्येक विकेंडला होणाऱ्या भाऊच्या धक्क्यावर अनेक सदस्यांची शाळा घेतो तर अनेक सदस्यांचं कौतुक करताना दिसतो. बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनने मराठीमधील इतर वाहिन्यांवरील काथाबाह्य कार्यक्रमांना मागे टाकून नवा इतिहास रचला आहे.

बिग बॉस मराठी या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोच्या विकेंडला होणाऱ्या भाऊच्या धक्क्याला ३.७ रेटिंग मिळाले आहे. तर रविवारीच्या अक्षय कुमार स्पेशल भाऊच्या धक्क्याला ४.० रेटिंग मिळाले आहे. बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनला एकंदरीतच ३.९ रेटिंग मिळाल्याची माहिती समोर येत आहे. बिग बॉस मराठीने प्रत्येक आठवडा गाजवला आहे. प्रत्येक आठवड्यामध्ये सदस्यांची जुगलबंदी आणि राडे पाहायला मिळत आहेत. बिग बॉस मराठीचा नवा सिझन आजून किती रेकॉर्ड ब्रेक करणार हे पाहाणं रंजक ठरेल.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

SCROLL FOR NEXT