बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपती (Vijay Sethupathi) सध्या त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas Movie) या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळत आहे. या चित्रपटात कतरिना आणि विजय पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसत आहेत. दोघांच्याही चाहत्यांना त्यांची केमिस्ट्री पसंत पडत आहे. प्रत्येक चित्रपटाप्रमाणे या चित्रपटाला देखील IMDb ने रेटिंग दिले आहे. या चित्रपटाला दहा पैकी चांगले रेटिंग मिळाले आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित झाला.
IMDb ने कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्या मेरी ख्रिसमसच्या चित्रपटाला 10 पैकी 8.8 रेटिंग दिली आहे. जे अनेक चित्रपटांनुसार अतिशय चांगले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन चित्रपट निर्माता श्रीराम राघवन यांनी केले आहे. 'अंधाधुन' आणि 'बदलापूर' यासारखे दर्जेदार चित्रपटांची निर्मिती देखील राघवन यांनी केली आहे. त्यांच्या अप्रतिम कामाची जादू 'मेरी ख्रिसमस' मध्ये देखील बघायला मिळाली. या चित्रपटाला त्यामुळे प्रेक्षक चांगली पसंती देत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दिवसेंदिवस चांगली कमाई करत आहे.
राघवन यांनी यापूर्वी 'अंधाधुन' आणि 'बदलापूर' सारखे चित्रपट देखील केले आहेत. ज्यांना IMDb कडून असे रेटिंग मिळालेले नाही. मात्र, राघवन यांचे उत्कृष्ट कथाकथन या तिन्ही चित्रपटांमध्ये पाहायला मिळाले जे खरोखरच कौतुकास पात्र आहे. 'मेरी ख्रिसमस'मधील कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांची दमदार केमिस्ट्री पडद्यावर वेगळीच जादू निर्माण करून जात आहे. या चित्रपटाने त्याच्या आकर्षक कथन आणि उत्कृष्ट अभिनयासाठी मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळाली आहे.
IMDb ने श्रीराम राघवन यांच्या चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. 'मेरी ख्रिसमस' या यादीतील आतापर्यंतचा सर्वाधिक रेटिंग असलेला चित्रपट ठरला आहे. यानंतर, राघवन यांचा 'अंधाधुन' चित्रपट आहे ज्याला IMDb ने 8.2 रेटिंग दिले आहे. यानंतर, 'जॉनी गद्दार' चित्रपटाला ७.९ रेटिंग देण्यात आली आहे. 'एक हसीना थी' या चित्रपटाला 7.5 रेटिंग देण्यात आले आहे. तर 'बदलापूर'चित्रपटाला 7.4 रेटिंग दिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.