bigboss marathi canva
मनोरंजन बातम्या

Big Boss Marathi 5 : बिग बॉसच्या घरात जोरदार राडा; धनंजय आणि आर्यामध्ये जोरदार जुंपली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बिग बॉस मराठीच्या ५व्या सिझनला सुरुवात झाली आहे. अगदी दोन आठवड्यातच फ्रेक्षक शोला भरपूर पसंती देतांना दिसत आहेत. सुरुवातीच्या दिवसांपासूनच सदस्यंमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणांवरून राडे पाहायला मिळत आहेत. घरातील सर्व सदस्य त्यांची कामंकरत असताना एक मेकांना चिडवताना किंवा काही बोलताना दिसतात. शोमध्ये आपल्यासा दोन ग्रुप सुद्धा पहायला मिळतात. राडेचं नाही तर बिग बॉसमध्ये प्रेमाचे वारे देखील पहायला मिळत आहे.

बिग बॉस मराठीमधील सदस्य एकमेकांना डिवचण्याचा किंवा समजवण्याचा प्रयत्न करत असतात. गेल्या आठवड्यातच रितेश देशमुखने जान्हवी किल्लेकरची भाऊच्या धक्क्याच्या भागामध्ये कान उघडणी करताना दिसले. परंतु त्यानंतर सुद्धा सदस्यांमधील राडे काही कमी झालेले दिसत नाही. बिग बॉस मराठीमध्ये जान्हवी आणि वर्षा उसगावकर यांच्यातील राडे काही दिवसांपूर्वी चर्चेत होते. मात्र नुकताच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये अजून दोन सदस्यांनधील राजा पहायला मिळाला.

बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोमध्ये डिपी म्हणजेच धनंजय पवार आणि मराठोळी रॅपर आर्या यांच्यामध्ये राडा होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आर्या आणि डिपीमध्ये जेवणावरून राडा होताना दिसत आहे. धनंजयच्या एका वाक्यामुळे त्यांच्या मधील राड्याने अधिक पेट घेतला

प्रोमोच्या सुरुवातीला डिपी आर्याला म्हणतो की, '' तु जरा कमी खात जा.'' त्यावर आर्या म्हणते ''तुम्ही माझ्या जेवमावर कमेंट करायचं नाही. मी दिवसभरात एकवेळा जेवेण किंवा दोन वेळा तुम्ही मला सांगू नका '' त्यावर लगेच धनंजय म्हणतो की, '' माझ्या समोर तुझं तोंड बंद ठेव नाहीतर मी तुला जेवताना बोलणार. '' त्यानंतर धनंजय एक वादग्रस्त वक्तव्य बोलतो की '' थर्ड क्लास लोकांच्या बाबतीत मी बोलत नाही. '' डिपीच्या या वाक्यामुळे त्याच्या आणि आर्यामध्ये जबरदस्त भांडण होईल का? यंदाच्या भाऊच्या घक्क्यावर घनंजयची शाळा घेतली जाईल का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.

Edited By: Nirmiti Rasal

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT