Akshay Kelkar Bought New House Instagram
मनोरंजन बातम्या

Akshay Kelkar Bought New House: बिग बॉस फेम अक्षय केळकरने खरेदी केलं स्वत:चं नवं कोरं घर; ‘२०२३ ची सुरुवात आणि शेवट दोन्ही “विजेता”...’ पोस्ट करत म्हणाला...

Akshay Kelkar News: बिग बॉस फेम अक्षय केळकरने मुंबईमध्ये स्वत:चं नवं कोरं घर घेतलं आहे. नव्या घराचा व्हिडिओ अक्षयने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Chetan Bodke

Akshay Kelkar Bought New House

२०२३ हे वर्ष खरं अनेक सेलिब्रिटींसाठी खास ठरलेलं आहे. या वर्षात अनेक सेलिब्रिटींनी नवं घर, नवी लक्झरियस कार खरेदी करत चाहत्यांना गुड न्यूज दिलेली आहे. काहींनी नवा व्यवसाय सुरु करत नव्या क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. अशातच बिग बॉस फेम अभिनेता अक्षय केळकरने नवं घर घेत चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. त्याने मुंबईमध्ये स्वत:चे एक अलिशान घर खरेदी केली आहे. अभिनेत्याने नव्या घराची सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अक्षय केळकरची पोस्ट

शेअर केलेल्या पोस्टमध्ये अक्षय केळकर म्हणाला, ‘माझं पहिलं घर - ते ही मुंबईत !!!! २०२३ मध्ये सगळ्या सुंदर गोष्टी आयुष्यामध्ये घडल्या. त्यातली खूप सुंदर आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुंबईत माझं स्वतःचं “घर” !!! काही वर्षांपूर्वी जेव्हा या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या ५ मित्रांसोबत, म्हाडाच्या बिल्डिंग मध्ये रूम शेअर करून भाड्याने राहत होतो. त्याच म्हाडाच्या मुंबईच्या प्रकल्पामध्ये या वर्षी अर्ज केला होता आणि सोडतीमध्ये विजेता ठरलो! स्वप्नवत आहे पण, मला हवा तसा व्ह्यू मिळाला आहे. ज्यातून मी रोज चमकणाऱ्या, धावणाऱ्या मुंबईला बघू शकतो.’

यावेळी अक्षयने आपल्या पोस्टमध्ये म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या मदतीमुळे त्यांचे आभार मानले आहेत. आपल्या पोस्टमध्ये पुढे अक्षय म्हणाला, ‘आज माझ्या घराची चावी हातात आली! या वर्षाची सुरुवात आणि शेवट दोन्ही “विजेता” अशी होते आहे, ही मालिका या पुढे अशीच सदैव सुरू राहू दे... तर अश्या प्रकारे, मुंबईत स्वतःच घर झालं! माझं पहिलं घर मुंबईमध्ये झाल्याची बातमी तुम्हाला सांगताना मला फार आनंद होत आहे.’ अशी पोस्ट त्याने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

अक्षय केळकरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, २०१४ मध्ये, अक्षय केळकरने मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्याने टकाटक २, कान्हा सारख्या काही चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. त्यासोबतच अनेक टेलिव्हिजन शोमध्ये आणि काही रिॲलिटी शोमध्ये दिसला आहे. ‘बिग बॉस मराठी ४’चा अक्षय केळकर विजेता ठरला असून तो या शोच्या माध्यमातून खूपच प्रसिद्धीत आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medha Rana: बॉर्डर २ मध्ये झळकणारी मेधा राणा कोण? जाणून घ्या

Pune Rave party Case : प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, एकनाथ खडसे यांच्याकडून गंभीर आरोप; पुणे पोलीस आयुक्तांकडून स्पष्टीकरण

Raigad : रायगडमध्ये मासेमारी बंदीच्या आदेशाचे उल्लंघन! 38 मच्छिमारांवर कारवाई | VIDEO

दह्यासोबत हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, फूड पॉयझनचा असतो धोका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू, मंचावर भाजप नेत्याच्या डुलक्या; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT