RARKPK: रणवीर सिंगच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मधील 'रंधवा मॅन्शन'मध्ये हत्याकांड, नेमकं काय घडलं?

Murder In Randhawa Mansion: या चित्रपटाच्या शूटिंगनंतर आता हे घर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यामागचे कारण खूपच धक्कादायक आहे. या बंगल्यामध्ये एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
Randhawa Mansion
Randhawa MansionSaam Tv

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani:

दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) बऱ्याच वर्षांच्या ब्रेकनंतर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनाच्या दुनियेत परत आला. रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट)(Alia Bhatt) यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली.

त्याचसोबत समीक्षकांकडून देखील या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटाच्या विलक्षण कथेसोबतच चित्रपटातील आणखी एक गोष्ट सर्वांचे लक्ष वेधले होते ते म्हणजे 'रंधवा पॅराडाईज'c(randhawa mansion). ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेले रणवीर सिंगचे घर खूपच आलिशान आणि एखाद्या राजवाड्यासारखे आहे. हे घर ग्रेटर नोएडा येथे आहे. या चित्रपटाच्या शूटिंगनंतर आता हे घर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यामागचे कारण खूपच धक्कादायक आहे. या बंगल्यामध्ये एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चे शूटिंग उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा वेस्ट येथील गौर मलबेरी फार्म हाऊसमध्ये झाले. या चित्रपटात रणवीर सिंगची भूमिका रॉकी रंधावा या फार्म हाऊसमध्ये कुटुंबासह राहत असल्याचे दाखवण्यात आले होते. या चित्रपटानंतर हे फार्म हाऊस चर्चेत आले आहे. या फार्म हाऊसमध्ये एक व्यक्ती मृतावस्थेत आढळला आहे. या फार्म हाऊसमध्ये 55 वर्षीय अशोक यादव यांची हत्या करण्यात आली आहे. हे प्रकरण चर्चेत आहे.

Randhawa Mansion
Sam Bahadur Special Screening: ‘सॅम बहादूर’च्या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान मॉडर्न कतरिना झाली 'संस्कारी बहू', एका कृत्यानं जिंकली नेटकऱ्यांची मने

सेंट्रल नोएडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ग्रेटर नोएडा पश्चिम येथील गौर मलबेरी फार्म हाऊसमध्ये सोमवारी रात्री लग्न होते. या लग्नात गाझियाबादचा रहिवासी शेखर याने सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अशोक यादव यांची गोळ्या झाडून हत्या केली. अशोकचा मुलगा आणि शेखरची मुलगी यांच्यात घटस्फोट सुरू होता. यावरून दोन्ही कुटुंबात वाद सुरू होता. सध्या पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

Randhawa Mansion
Randeep Hooda Lin Laishram Wedding: रणदीप हुड्डा अडकला लग्नबंधनात, पारंपारिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com