Tiger 3 Movie : टायगर ३ सिनेमा सुरु असतानाच प्रेक्षकांना बाहेर काढलं; ग्रेटर नोएडामधील ग्रँड व्हेनिस मॉलमधील घटना

Tiger 3 Movie : प्रशासनाने थकबाकी वसूल करण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. ग्रँड व्हेनिस मॉलमधील थिएटर सील केले आहे. मॉलच्या मालकाकडे 1.95 कोटींची थकबाकी असल्याचे कारण सांगण्यात येत आहे.
Tiger 3 Box Office Collection Day 2
Tiger 3 Box Office Collection Day 2Instagram @beingsalmankhan
Published On

Greater Noida :

सलमान खानचा टायगर 3 सिनेमा पाहायला गेलेल्या प्रेक्षकांचा हिरमोड झाला आहे. कारण प्रेक्षकांना सिनेमा सुरु असताना अर्ध्यावर बाहेर पडावं लागले आहे. मॉलच्या मालमत्ता कर थकबाकीचा फटका प्रेक्षकांना बसला आहे. ग्रेटर नोएडामधून हा प्रकार समोर आला आहे.

ग्रेटर नोएडामध्ये जिल्हा प्रशासनाने थकबाकी वसूल करण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. ग्रँड व्हेनिस मॉलमधील थिएटर सील केले आहे. मॉलच्या मालकाकडे 1.95 कोटींची थकबाकी असल्याचे कारण सांगण्यात येत आहे.  (Bollywood)

Tiger 3 Box Office Collection Day 2
Randeep Hooda Lin Laishram Wedding: रणदीप हुड्डा अडकला लग्नबंधनात, पारंपारिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक बांधकाम व्यावसायिकांचा थकबाकीदारांच्या यादीत समावेश आहे. ज्यांनी वारंवार नोटीस देऊनही थकबाकी भरलेली नाही. यामध्ये व्हेनिस मॉलचाही समावेश आहे. 1.95 कोटींची थकबाकी न भरल्याने प्रशासनाने व्हेनिस मॉलमधील सिनेमा हॉल सील केला आहे.

प्रशासनाने ही कारवाई केली तेव्हा चित्रपटगृहात सलमान खानचा टायगर 3 हा चित्रपट सुरू होता. अधिकार्‍यांनी चित्रपट मध्यभागी थांबवला आणि थिएटर सील केलं. हा व्हेनिस मॉल भसीन इन्फ्राट्रॅक आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचा आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बिल्डरला अनेकवेळा नोटीस पाठवून देखील त्याने पैसे जमा केले नाहीत. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून ग्रँड व्हेनिस मॉलमध्ये असलेले थिएटर सील करण्यात आले आहे. दादरी तहसीलमधील विविध बिल्डर्सवर सुमारे 500 कोटी रुपयांची थकबाकी आहे. याशिवाय या तहसील अंतर्गत येणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांकडे 100 कोटींची थकबाकी आहे.

Tiger 3 Box Office Collection Day 2
Ayushmann Khurrana Video: आयुष्मान खुरानाला 'Moye Moye'ची भूरळ, लाइव्ह कॉन्सर्टमध्येच गायलं गाणं

बिल्डरांवर जवळपास 600 कोटींची थकबाकी

जिला प्रशासनाने या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 178 कोटी रुपये जमा केले आहेत. नोएडा आणि ग्रेटर नोएडाच्या बिल्डर्सवर RERA ची सुमारे 600 कोटी रुपयांची देणी आहेत. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार थकीत रक्कम वसूल करण्यासाठी कडक कारवाई करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com