NCP Party Hearing : बायको, नवरा आणि घटस्फोट; राष्ट्रवादीच्या सुनावणीत शरद पवार गटाच्या वकिलांनी मांडला जोरदार युक्तिवाद

Sharad Pawar Vs Ajit Pawar: बायको, नवरा आणि घटस्फोट; राष्ट्रवादीच्या सुनावणीत शरद पवार गटाच्या वकिलांनी मांडला जोरदार युक्तिवाद
Sharad Pawar Vs Ajit Pawar
Sharad Pawar Vs Ajit PawarSaam Tv
Published On

>> प्रसाद जगताप

NCP Party Crisis:

राज्यात सध्या सुनावणी हा शब्द जोरदार गाजतोय. एकीकडे शिवसेनेची आमदार अपात्रतेची सुनावणी सुरु आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीची पक्ष आणि चिन्हावरुन सुनावणी सुरु आहे. शिवसेनेच्या सत्तासंघर्षाची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुरु आहे. तर राष्ट्रवादीची सुनावणी केंद्रीय निवडणुक आयोगात सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाच पक्षावर अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांनी दावा केला आहे. आम्हीच खरे पक्षाचे मालक, हे पटवून द्यायला दोन्ही गटांकडून जोरदार युक्तीवाद केले जात आहे. अशातच आज शरद पवार गटाच्या वकिलांनी निवडणुक आयोगात जोरदार बॅटिंग केली आहे. त्यांनी अजित पवार गटावर काही गंभीर आरोप केले आहेत. नेमके ते आरोप काय? आणि शरद पवार गटाच्या बाजूने आज काय काय युक्तीवाद झाला आहे, हे जाणून घेऊ..

निवडणुक आयोगात आज शरद पवार गटाला आपली बाजू मांडायला वेळ देण्यात आला होता. शरद पवार गटाचे वकिल देवदत्त कामत यांनी युक्तीवादाला सुरुवात केली. त्यांनी अजित पवार गटावर आणि स्वत: अजित पवार यांच्यावर काही गंभीर आरोप केलेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? यावरुन निवडणूक आयोगात दोन्ही गट आपली बाजू मांडणार आहेत. आज शरद पवार गटाच्या वतीने देवदत्त कामत यांनी युक्तीवादाला सुरुवात केली. देवदत्त कामत यांनी थेट शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Pawar Vs Ajit Pawar
Hamas Released Hostages : मोठी बातमी! हमासने 25 ओलिसांची केली सुटका; थाई आणि इस्रायली नागरिकांचा समावेश

आत्तापर्यंत त्यांनी पक्षाचा तळागळापर्यंत विस्तार केलाय, म्हणून त्यांच्या अध्यक्षपदावर प्रश्न उपस्थित केला जाऊ शकत नाही, असा दावा केला. त्याचबरोबर शरद पवार गटाची भूमिका ही कायम पक्षाच्या हिताची राहिली आहे, असा युक्तीवाद करण्यात आला. शरद पवारांची बाजू मांडतांना देवदत्त कामत यांनी अजित पवारांवर काही गंभीर आरोपही केलेत. अजित पवारांची आजवर पक्षवाढीसाठी आणि कुठलीही भूमिका नसल्याचं सांगितलं, असा आरोप केला आणि हा वाद अध्यक्षपदासाठी नाही तर, एका गटाला पक्षावर ताबा हवाय, त्यासाठी जाणीवपूर्वक हा कट रचला गेल्याचाही त्यांनी अजित पवार गटावर आरोप केला आहे. (Latest Marathi News)

दोन्ही गट कसे सोबतच शरद पवरांच्या नेतृत्वात निवडणूक लढले आणि महाविकास आघाडीचा कसा जन्म झाला, हे देखील देवदत्त कामत यांनी निवडणूक आयोगाला सविस्तर सांगितलं. यानंतर अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व सत्ता हवी होती, म्हणून त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधला, असाही आरोप त्यांनी अजित पवार यांच्यावर केला.

Sharad Pawar Vs Ajit Pawar
Mumbai News : मोठी बातमी! मुंबईत 4 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी, नेमकं काय आहे कारण?

देवदत्त कामत यांनी अजित पवारांबरोबर प्रफुल्ल पटेल यांच्यावरही निशाणा साधला. कामत म्हणालेत की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचं दिल्लीत 18वं अधिवेशव पार पडलं. या अधिवेशनात शरद पवार यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि याचे प्रस्तावक खुद्द प्रफुल्ल पटेलच होते. पण आता तेच प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या अध्यक्षपदाच्या निवडीला बेकायदेशिर ठरवत आहेत,.असा टोला देवदत्त कामत यांनी लगावला. ही सर्व प्रक्रिया निवडणूक अधिकारी म्हणून पितांबर मास्टर यांनी पार पाडली असल्याचंही देवदत्त कामत यांनी सांगितलं.

त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक नव्हती. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी अधिवेशन घेण्यात आले होतं. या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये जवळपास 558 पदाधिकारी उपस्थित होते. पक्षातील हे सर्वोच्च पदाधिकारी शरद पवार यांच्या बाजूने मतदान करणारे होते. शरद पवार यांना देण्यात आलेले सर्व अधिकार पदाधिकाऱ्यांना मान्य होते. जर पदाधिकाऱ्यांना अधिकार मान्य होते. तर मग शरद पवार यांची अध्यक्ष पदाची निवड बेकायदेशीर कशी? असा प्रश्नही देवदत्त कामत यांनी निवडणुक आयोगाला विचारला.

या अधिवेशनानंतर अजित पवार आणि प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली होती. पत्रकार परिषदेत त्यांनी एकमताने शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली असल्याची बाब अधोरेखित केली होती. पत्रकार परीषदेनंतर शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. हे पत्र देशभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यालयांना आणि पदाधिकाऱ्यांना प्रफुल पटेल यांनीच पाठवले होते. प्रफुल पटेल यांनी पाठवलेल्या पत्रावर सर्व कार्यालयानी आनंदाने निर्णय स्वीकारल्याचही कळवलं होत. कुणीही त्याला विरोध केला नव्हता. त्यामुळे अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कशी निवड होऊ शकते? असा प्रश्न देवदत्त कामत यांनी उपस्थित केला.

एका रात्रीत नवरा बायकोला सुद्धा घटस्फोट मिळत नाही. त्यासाठी देखील कलावधी जाऊ द्यावा लागतो. मग इथं कसा एकाच दिवसात अध्यक्ष बजदलला जातो, असा मिश्कील टोलाही देवदत्त कामत यांनी लागवला. एकंदरीतच देवदत्त कामत यांनी आज जोरदार बॅटिंग केली. देशाच्या राजकारणातले जुने संदर्भ, राज्यघटनेचे संदर्भ आणि आमदार खासदारांच्या संख्याबळाचं गणित मांडत, शरद पवार गट कसा वरचढ आहे. हे देवदत्त कामत यांनी निवडणूक आयोगाला पटवून दिलं. यातच आता अजित पवार गटाकडून नेमका काय युक्तिवाद मांडला जाऊ शकतो, हे पाहावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com