MHADA Lottery: आपले हक्काचे घर असावे असे प्रत्येकाला वाटत असते. त्यांचे हे स्वप्न म्हाडाच्या (MHADA Lottery)माध्यमातून पूर्ण होत असते. आज म्हाडा विभागाकडून नव्याने सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आज म्हाडा कोकण मंडाळाची सोडत निघणार आहे. 4640 घरांसाठीची ही म्हाडाची 2023 मधील पहिली सोडत असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या कोकण मंडळाच्या (MHADA Konkan Lottery 2023) 4,640 घरे आणि 14 भूखंडांसाठी आज ठाण्यात सोडत होणार आहे. या सोडतीत अत्यल्प, अल्प, मध्यम उत्पन्न गटासाठीच्या घरांचा समावेश आहे. आज सकाळी 10 वाजता ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ही सोडत निघणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात येणार आहे.
म्हाडातर्फे या सोडतीच्या स्वीकृत अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण 49,174 अर्ज पात्र ठरले आहेत. यावर्षीच्या म्हाडा लॉटरीमध्ये अर्ज सादर करताना म्हाडाने अनेक बदल केले होते. असे असताना देखील अर्जदारांनी या लॉटरीला चांगला प्रतिसाद दिला. महत्वाचे म्हणजे म्हाडाच्या घराची ही सोडत तुम्ही कुठूनही आणि घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता.
म्हाडा कोकण मंडळाच्या घरांची सोडत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पाहू शकणार आहेत. यासाठी तुम्हाला bit.ly/konkan_mhada या लिंकवर क्लिक करावे लागेल. या माध्यमातून तुम्ही आहे त्याठिकाणावरुन सोडत पाहू शकता. जेणे करुन या सोडतीमध्ये तुम्हाला घर लागले आहे की नाही हे समजेल. त्यासोबतच या सोडतीमध्ये नाव जाहीर झालेल्या विजेत्यांची यादी म्हाडाकडून https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास प्रसिद्ध केली जाणार आहे.
त्यासोबत ज्यांना म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये घर मिळाले आहे अशा विजेत्यांना म्हाडाकडून एसएमएस करत याबातची माहिती देखील देण्यात येणार आहे. विजेत्यांना म्हाडाकडून तात्पुरतं देकारपत्र आणि सूचनापत्रही देण्यात येणार आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ठाणे शहर-जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याठिकाणी विविध योजनांतर्गत तयार केलेल्या घरांसाठी ही सोडत जाहीर होणार आहे. खोणी-कल्याण, शिरढोण, विरार-बोळिंज वगोठेघर येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 984 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेला केंद्र शासनाची मंजुरी असून योजनेमधील सर्व सदनिकांना केंद्र शासनाचे 1.50 लाख आणि राज्य शासनाचे 1 लाख अनुदान मिळणार आहे. तर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विरार बोळिंज येथील 2 हजार 48 सदनिकांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.