Vishal Nikam Wedding saam tv
मनोरंजन बातम्या

Vishal Nikam Wedding : "चंद्रभागेसारखे प्रेम आपले सखी..."; मराठमोळ्या अभिनेत्याने उत्तराखंडमध्ये घेतले सप्तपदी, शाही विवाह सोहळ्याची झलक पाहा-VIDEO

Vishal-Akshaya Wedding Video : 'बिग बॉस मराठी 3'चा विजेता लग्न बंधनात अडकला आहे. अभिनेत्याचा उत्तराखंडमध्ये विवाह सोहळा पार पडला आहे. लग्नाचा सुंदर व्हिडीओ पाहा.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 3'चा विजेता लग्न बंधनात अडकला.

मराठमोळ्या अभिनेत्याचा उत्तराखंडमध्ये विवाह सोहळा पार पडला.

अभिनेत्याने लग्नाचा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

अखेर मराठी टिव्ही सृष्टीतील लोकप्रिय जोडी विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर लग्न बंधनात अडकले आहेत. विशाल निकम हा 'बिग बॉस मराठी 3' चा विजेता आहे. बिग बॉसच्या घरात असताना त्यांने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. विशाल-अक्षया यांनी हरिद्वारमध्ये साखरपुडा केला. आता विशाल निकम आणि अक्षया हिंदळकरने लग्नाचा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून तुम्हीही भारावून जाल.

लग्नाचे लोकेशन काय?

विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर यांनी 10 फेब्रुवारी 2026ला लग्नगाठ बांधली. विशाल-अक्षयाचा शाही विवाह सोहळा एका खास ठिकाणी पार पडला. हे लोकेशन म्हणजे उत्तराखंड येथील त्रियुगीनारायण मंदिर होय. या मंदिरात विशाल-अक्षयाने सातफेरे घेतले आहे. अशी आख्यायिका आहे की, याच ठिकाणी शिव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता. तसेच योगायोग म्हणजे 10 फेब्रुवारीला विशाल निकमचा वाढदिवस होता.

लग्नाचा लूक

विशाल निकम आणि अक्षया हिंदळकरने लग्नासाठी पारंपरिक लूक केला होता. विशालने मेहंदी रंगाचे धोतर नेसले होते. डोक्यावर मुंडावळ्या बांधल्या होता. तर अक्षयाने लेहेंगा परिधान केला होता. तिने मेहंदी रंगाचा ब्लाउज आणि केशरी रंगाचा सुंदर लेहेंगा परिधाने केला. मराठमोळा साज श्रृंगार करून तिने हा लूक पूर्ण केला. दोघांनी मंदिरात, मंगलमय वातावरणात सात फेरे घेतले. विशालने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले, भांगेत कुंकू भरले. दोघांनी एकमेकांना हार घातले. अशा प्रकारे शाही विवाह सोहळा पार पडला.

विशाल-अक्षयाची पोस्ट

"चंद्र भागेसारखं प्रेम आपल सखी

मी तुझ्यात सामावून जाईन

रुसली जरी तू रखुमाई सारखी

मी सावळा विठ्ठल होऊन जाईन

कायम तुझा रुसवा काढून

तुला आयुष्यभर मनवत राहीन..."

विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर यांच्या लग्नाला दोघांचे कुटुंब, जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. सध्या विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहते आणि कलाकार दोघांना त्यांच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. 'साता जन्माच्या गाठी' या मराठी मालिकेत अक्षया हिंदळकर आणि विशाल निकमने एकत्र काम केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Period Care : पीरियड्समध्ये अति गोड खाणे पडू शकते महागात, फूड क्रेव्हिंग 'असं' करा कंट्रोल

Vertical Property Card: सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक फ्लॅट मालकाला मिळणार ‘ खास कार्ड’, काय आहेत फायदे?

Waking up at 3am: रात्री नेमकी ३ वाजताच जाग येते? कारणं जाणून घ्या आत्ताच

Maharashtra News Live Update: बारामती-राहुरी पोटनिवडणूक सार्वजनिक सुट्टी, सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय

Bollywood Couple Pregnant: पुन्हा गोड बातमी! बॉलिवूड स्टार कपलच्या घरी 'बेबी नं. 2'ची चाहूल

SCROLL FOR NEXT