Bigg Boss SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss: बिग बॉसच्या विजेत्याचं घराचं स्वप्न झालं पूर्ण; मुंबईत घेतला आलिशान फ्लॅट, किंमत किती?

New Home : बिग बॉस फेम कलाकाराने मुंबईत स्वतःचं घर घेतलं आहे. हा सेलिब्रिटी कोण जाणून घ्या.

Shreya Maskar

मुंबईत स्वतः च्या हक्काचं घर असाव असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी प्रत्येक जण मेहनत घेतो. मुंबईत घर घेण्यासाठी म्हाडाची लॉटरी हा उत्तम पर्याय आहे. ही सर्वसामान्यांसाठी घर मिळवण्याची सुवर्णसंधी असते. कमी किंमतीमध्ये चांगली घरे मिळतात. यंदा म्हाडाच्या घरामध्ये कलाकारांचा देखील नंबर लागला आहे. मुंबईत वेगवेगळ्या भागात म्हाडाच्या 2030 घरांसाठी सोडत जाहीर केली होती.

बिग बॉस (Bigg Boss) मराठी 2 विजेता शिव ठाकरेला (Shiv Thakare ) म्हाडाची लॉटरी लागली आहे. पवई मधील म्हाडाचे घर शिव ठाकरेला मिळाले आहे. त्याला म्हाडाच्या सोडतीमध्ये घरी लागलं आहे. शिवने म्हाडाच्या एचआयजी श्रेणीतील घरांसाठी अर्ज केला होता. या घराची किंमत 1 कोटी 78 लाख रुपये इतकी आहे. स्वतःचे घर झाल्यामुळे शीव खूप आनंदी आहे.

म्हाडाच्या लॉटरीच्या यादीत अनेक इतर कलाकारांची नावे देखील आहेत. यात अभिनेत्री गौतमी देशपांडे, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता निखिल बने, अभिनेता गौरव मोरे तसेच आणखी काही कलाकारांचा यात समावेश आहे.

शिवने अनेक रिॲलिटी शो केले आहेत. तो आपल्या मनमिळाऊ आणि शांत स्वभावाने सर्वांची मने जिंकून घेतो. शिवचा मोठा चाहता वर्ग आहे. शिव ठाकरेने हिंदी बिग बॉस, खतरों के खिलाडी हे शो देखील गाजवले आहेत. शिवचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच आतुर असतात. नुकताच शिव बिग बॉस मराठी 5 च्या घरातही गेला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

मोठी बातमी! राज्यात तब्बल १.१४ लाख कोटींची गुंतवणूक; किती जणांच्या रोजगाराचा प्रश्न मिटणार?

SCROLL FOR NEXT