'बिग बॉस मराठी' चा (Bigg Boss Marathi ) खेळ आता काही दिवसांचा उरला आहे. हा सीझन खूप गाजला. घरातील सदस्यांनी प्रेक्षकांच्या मनावर खूप राज्य केलं. यंदाच्या सीझनमध्ये वेगवेगळ्या भागातील सदस्य आले होते. त्यातील फक्त 7 सदस्य शेवटच्या टप्प्यात पोहचले आहेत. यातील कोण 'बिग बॉस मराठी 5' ची ट्रॉफी उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
वर्षा उसगांवकर यांना दर आठवड्याला 2.50 लाख रुपये मानधन देण्यात येते.
सर्वांचा लाडका गुलीगत सूरजला आठवड्याला फक्त 25 हजार रुपये मानधन मिळत आहे.
बिग बॉस घरात आपल्या खेळाने लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या धनंजय पोवारला दर आठवड्याला 60 हजार रुपये मानधन दिले जाते.
प्रत्येक टास्कमध्ये खूप खेळाडू वृत्तीने खेळणाऱ्या जान्हवी 1 लाख रुपये मानधन घेते.
आपली मते रोखठोक मांडणारा गायक अभिजीत सावंत दर आठवड्याला 3.50 लाख रुपये मानधन घेतो.
सर्वांची लाडकी कोकण हार्टेड गर्ल म्हणजे अंकिता वालावलकर बिग बॉस मराठीमध्ये दर आठवड्याला ५० ते ६० हजार इतकं मानधन घेते.
बिग बॉस मराठी 5 गाजवणारी निक्की तांबोळी दर आठवड्याला 3.75 लाख रुपये मानधन घेते. निक्की या सीझनची सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक ठरली आहे.
आपल्या गेमने बिग बॉसचे 5 वे पर्व गाजवणारा अरबाज पटेलने दर आठवड्याला 1.25 लाख रुपये घेतले आहेत.
छोटा पुढारी म्हणजे घनश्याम दरवडे यांनी 50 हजार रुपये आठवड्याला घेतले आहेत.
बिग बॉसच्या घरातील वैभव चव्हाण याला दर आठवड्याला 70 हजार रुपये मिळाले.
बिग बॉसच्या घरातील सर्वांचा लाडका पॅडी दादा दर आठवड्याला 2 लाख रुपये मानधन दिले जात होते.
निक्कीला थोबाडीत वाजवणारी आर्या जाधवने 1 लाख रुपये दर आठवड्याला कमावले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.