Shehnaaz Gill SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shehnaaz Gill : शहनाज गिल लग्न करणार नाही? 'Ikk kudi'च्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्रीने केलं मोठे विधान

Shehnaaz Gill Talk On Marriage : शहनाज गिलचा नुकताच 'इक कुडी' चित्रपट रिलीज झाला आहे. 'इक कुडी' च्या प्रमोशन दरम्यान तिने लग्न, प्रेम यावर आपले स्पष्ट मत मांडले आहे. ती नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

शहनाज गिलला 'बिग बॉस'मधून खूप लोकप्रियता मिळाली.

शहनाज गिलचा 'इक कुडी' चित्रपट 31 ऑक्टोबरला रिलीज झाला आहे.

'इक कुडी' च्या प्रमोशन दरम्यान शहनाज गिलने लग्न, प्रेम यावर आपले स्पष्ट मत मांडले आहे.

बिग बॉसच्या घरात आपल्या चुलबुली स्वभावाने प्रेक्षकांचे मन जिंकणारी शहनाज गिलचा (Shehnaaz Gill) नुकताच नवीन चित्रपट रिलीज झाला आहे. बिग बॉसच्या घरात तिचा प्रामाणिक स्वभाव, स्पष्टवक्तेपणा आणि निरागसता लोकांना खूप आवडली. बिग बॉसमध्ये असताना तिचे आणि दिवंगत सिद्धार्थ शुक्लाचे प्रेम जुळले. त्यांचे नाते बिग बॉसच्या बाहेरही चांगले चालले. सिद्धार्थच्या निधनाने शहनाज गिलला मोठा धक्का बसला. मात्र स्वतःला सावरत तिने आता इंडस्ट्रीत मोठे नाव कमावले आहे.

नुकतेच 'इक कुडी' (Ikk Kudi) च्या प्रमोशन दरम्यान तिने लग्न या विषयावर आपले स्पष्ट मत मांडले. ती म्हणाली की, "आजच्या काळात लग्नाला गरज नाही. भविष्यात योग्य परिस्थिती निर्माण झाली तरी मी लग्नाचा विचार करेन" आयएएनएसशी बोलताना शहनाज म्हणाली, "लग्न महत्त्वाचे नाही. जर तुम्हाला ते करायचे नसेल तर ठीक आहे. लोक लग्न करतात. जरी मला आता वाटत असेल की, मी लग्न करणार नाही... तरी मी असे म्हणू शकत नाही की मी कधीच लग्न करणार नाही. कदाचित, मला ते उद्या करावे लागेल. मला स्वतःसाठी योग्य निर्णय घ्यावा लागेल."

पुढे शहनाज म्हणाली की, "लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचे नाही. तर दोन कुटुंबाचे नाते आहे. तुम्ही तुमच्या आईवडिलांचे घर सोडल्यानंतर एका मुलाला तुमचे संपूर्ण आयुष्य देता. तुम्ही त्याच्यासाठी सर्व काही करता. हा एक मोठा निर्णय आहे. तुमचा जोडीदार कोण असेल हे तुम्हाला माहिती नाही. म्हणून तुम्ही शहाणपणाने निर्णय घेतला पाहिजे. "

शहनाज गिलचा 'इक कुडी' चित्रपट 31 ऑक्टोबरला रिलीज झाला आहे. या चित्रपटातून शहनाज गिलने निर्माती क्षेत्रात पदार्पण केले आहे. 'इक कुडी' चे दिग्दर्शन अमरजीत सिंह सरोन यांनी केले आहे. या चित्रपटात जीवनसाथी शोधण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. 'किसी का भाई किसी की जान', 'थँक्यू फॉर कमिंग', 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' या चित्रपटांमध्ये दिसली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earthquake: अमरावती पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं; ३ महिन्यात चौथ्यांदा जाणवले भूकंपाचे धक्के

नव्या लोखंडी कढईचा चिकटपणा काही केल्या जात नाही? या सोप्या टीप्स वापरून पाहा

गेमचेंजर’ ठरणाऱ्या लॉजिस्टिक्स पार्कला विलंब का? खणखणीत इंग्रजीत ठाकरे गटाच्या खासदारानं केंद्रीय मंत्र्यांना विचारले प्रश्न

Horoscope: प्रेम,नोकरीबाबत येईल आनंदाची बातमी; जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Roasted Papad Side Effects: तुम्हीही पापड भाजून खाताय? मग होऊ शकतात हे गंभीर आजार, सवय आजच बदला

SCROLL FOR NEXT