प्रणित मोरे 'बिग बॉस 19' च्या घराचा नवीन कॅप्टन झाला होता.
'बिग बॉस 19'च्या घरातून प्रणित मोरेची एक्झिट झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्रणित मोरेला डेंग्यू झाल्याचे बोले जात आहे.
'बिग बॉस 19'मधून (Bigg Boss 19) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'बिग बॉस 19'ची माहिती देणारे अनेक सोशल मिडिया अकाउंट आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बिग बॉस 19'च्या घरातून प्रणित मोरे बाहेर पडला आहे. यामुळे प्रणित मोरेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. प्रणित मोरेने आपली चपळ बुद्धी, मजेदार भाषणे आणि प्रामाणिक मतांमुळे प्रणित मोरेने बिग बॉसचे घर गाजवेल. त्याचा विनोदी स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा प्रेक्षकांना खूप आवडला.
मीडिया रिपोर्टनुसार, डेंग्यूचे निदान झाल्यानंतर प्रणित मोरेला 'बिग बॉस 19'मधून बाहेर काढण्यात आले. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. प्रॉडक्शनच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून प्रणित मोरे आजारी होता. त्यामुळे वैद्यकीय उपचारांसाठी त्याला घराबाहेर काढण्यात आले. तसेच प्रणित पूर्णपणे बरा झाल्यानंतर आणि वैद्यकीय परवानगी मिळाल्यानंतर त्याला घरात पुन्हा प्रवेश दिला जाईल. त्याच्या अचानक बाहेर पडण्याने चाहते चिंतेत पडले आहेत.
प्रणित आजारी (Pranit More) असल्यामुळे चाहते तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. प्रेक्षकांना पुन्हा एकदा प्रणित मोरेला घरात पाहायचे आहे. प्रणित मोरेच्या घराबाहेर जाण्यामुळे चाहते नाराज झाले आहेत. आपली नाराजी सोशल मीडियाच्या माध्यामातून व्यक्त करत आहेत. कारण असे देखील बोले जात आहे की, प्रणित मोरेला कमी मते मिळाल्यामुळे तो घराबाहेर गेला आहे. नेटकऱ्यांनी 'बिग बॉस 19'वर प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे.
अलिकडेच बिग बॉसच्या घरात मराठमोळा प्रणित मोरे आणि क्रिकेटपटूची बहीण मालती चाहर यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली. 'बिग बॉस 19'च्या घरात प्रणित आणि मालतीच्या नात्यावरून घरातील सदस्य त्यांना चिडवताना दिसले. व्हिडीओमध्ये मालती आणि प्रणीत एकत्र बसून खाताना दिसले. त्यांच्या मैत्रीची चर्चा सोशल मीडियावर चांगली रंगली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.