Suraj Chavan Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan Video: 'बिग बॉस' फेम सूरज चव्हाणला पडली अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'ची भूरळ, म्हणाला, 'फायर नही वाईल्ड फायर हू...'

Suraj Chavan Reel On Pushpa 2 Song: बिग बॉस फेम अभिनेता सुरज चव्हाणला पुष्पा 2 ची भुरळ पडली आहे. सोशल मीडियावर त्याने शेअर केलेला व्हिडीओ सध्या लक्ष वेधून घेत आहे.

Manasvi Choudhary

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा पुष्पा 2 हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. सध्या या चित्रपटाची तुफान क्रेझ आहे. चित्रपटातील गाणी आणि डायलॉगने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.सोशल मीडियापासून ते प्रत्येकांच्या तोंडावर पुष्पा 2 मधील गाणी ऐकायला मिळतात. अशातच बिग बॉस फेम अभिनेता सूरज चव्हाणला पुष्पा 2 ची भुरळ पडली आहे. सोशल मीडियावर त्याने शेअर केलेला व्हिडीओ सध्या लक्ष वेधून घेत आहे.

पुष्पा 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. सेलिब्रिटीसह सामान्य मंडळीना पुष्पा 2 च्या गाण्यांनी वेड लावलं आहे. अनेकांनी पुष्पाच्या गाण्यावर रिल्स शेअर केले आहेत. बिग बॉस फेम सूरज चव्हाणने हटके अंदाजात पुष्पाच्या डायलॉगवर रिल्स बनवली आहे. डोळ्याला गॉगल अन् स्टायलिश लूकमध्ये सूरज म्हणतोय," पुष्पराज सुनके फ्लॉवर समजी क्या, फ्लॉवर नाही फायर हू मै .... , पुष्पा नॅशनल खिलाडी समजी क्या ये इंटरनॅशनल है..."

सूरजने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याचा हटके अंदाज प्रभावित करणारा आहे. सूरजच्या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.

सूरज चव्हाण सध्या काय करतो?

सोशल मिडिया स्टार सूरज चव्हाणला बिग बॉसच्या घरातून मोठी प्रसिद्धी मिळाली. बिग बॉसच्या घरातील सूरजची खेळी प्रेक्षकांनी भावली. बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला आहे. बिग बॉसनंतर सूरजने सोशल मीडियावरचा त्याचा प्रवास कायम ठेवला आहे. नवनवीन हटके व्हिडीओ तो शेअर करत असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

SCROLL FOR NEXT