
'भाभीजी घर पर है' या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अंगुरी भाभी उर्फ शुभांगी अत्रे सध्या चर्चेत आली आहे. मालिकेतून शुंभागीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील शुभांगीच्या अंगुरी भाभी या भूमिकेला चांगलीच लोकप्रियता मिळाली. अभिनयासह शुंभागी कायमच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. शुभांगीला तिच्या खऱ्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगाना सामना करावा लागला आहे.
अभिनेत्री शुंभागी अत्रेने अत्यंत कमी वयात म्हणजेच २० व्या वर्षी पियुष तरे यांच्यासोबत लग्न केले. १९ वर्षानंतर या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या दोघांनीही १८ वर्षाची मुलगी आहे. नुकतंच दिलेल्या मुलाखतीत शुंभागीने दुसऱ्या लग्नाविषयी तिचं मत सांगितलंय.
शुंभागी तिच्या लाईफविषयी व्यक्त होताना म्हणाली, साधारणपणे लॉकडाऊनच्या काळात आम्हाला समजले की आम्ही दोघेही एकमेकांपासून खूप वेगळे आहोत. हे नाते फार काळ टिकणार नाही. यानंतर आम्ही विचार केला की एका विशिष्ट टप्प्यानंतर नात्याला पूर्णविराम दिला पाहिजे. सध्या मी खुप खुश आहे.
पुढे शुभांगी दुसऱ्या लग्नाविषयी बोलताना म्हणाली की,"दुसऱ्यांदा लग्न करण्यासाठी मला कुटुंबियाकडून काहीही दबाव नाही. मी सुद्धी कोणत्याच नात्यात नाही. पुन्हा लग्न करण्याची माझी इच्छा नाही. माझं कोणावर प्रेमही नाही किंवा कोणी मला प्रपोज देखील केलेलं नाही. माझं लग्न कमी वयात झाल्याने मी लवकरच आई झाले. मला १८ वर्षाची मुलगी आहे ती अमेरिकेत शिक्षण घेते आहे. माझी मुलगीच माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे आणि तिच्याकडून मी खूप काही शिकत असते."