
Saif Ali Khan son Ibrahim Ali Khan :बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान पापाराझींचा आवडता आहे. इब्राहिम अली खान दररोज जिममध्ये जाताना दिसतो. सैफची कार्बन कॉपी म्हणून इब्राहिम याची ओळख आहे. इब्राहिम दिसताच त्याला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझींची गर्दी करतात. पण शनिवारी इब्राहिम याचा खास अंदाज चाहत्यांच्या समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर इब्राहिमचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये इब्राहिम ‘जय श्री राम’चे नारे लावताना दिसत आहे.
इन्स्टंट बॉलिवूडच्या व्हायरल व्हिडीओमध्ये इब्राहिम अली खान काळ्या रंगाचे शॉर्ट्स आणि पांढरे जॅकेट घालून कारमध्ये बसलेले दिसत होते. अनेक गरीब भिकारी पैसे मागण्यासाठी इब्राहिमकडे आले. ते त्याला विचारतात, 'सर ५ रुपयांचे काय होणार?' इब्राहिमने उत्तर दिले, 'आता काय? ५ रुपयांनी काही होणार नाही पण काहीतरी झालं देखील पाहिजे? असं म्ह्णून तो जय श्री राम. म्हणाला आणि निघून गेला.
सध्या सोशल मीडियावर इब्राहिमचा व्हिडीओ तुफान व्हायरल असून नेटकरी या व्हिडीओवर कमेंट आहेत. एक नेटकरी इब्राहिमला म्हणाला, ‘बडे दिलवाला…’, दुसरा नेटकरीने ‘जय श्री राम… भाईने दिल जीत लिया…’ असे या व्हिडीओ खाली लिहिले इब्राहिमचा हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी खूप झाले असून सैफ अली खानने सारा सह यालादेखील नम्रपणा शिकवलं असल्याचे बोलत आहेत.
इब्राहिम अली खानचा बॉलिवूड डेब्यू
सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम 'सरजमीन' या आगामी चित्रपटमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. बोमन इराणी यांचा मुलगा कयोज इराणी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात इब्राहिमसोबत काजोल देखील दिसणार असून करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.