Entertainment News
Allu Arjun WifeSaam Tv

Allu Arjun Wife: अल्लू अर्जुन तुरूंगाबाहेर येताच पत्नीला अश्रू अनावर, धावत जाऊन मारली घट्ट मिठी, Video व्हायरल

Allu Arjun Wife Sneha Reddy Emotional Video: अल्लु अर्जुनची सुटका झाल्यानंतर अभिनेता त्याच्या घरी पोहोचला आहे याचदरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Published on

पुष्पा 2 फेम अभिनेता अल्लू अर्जुनची आज सकाळी तुरूंगातून सुटका झाली आहे. काल अल्लू अर्जुनला अटक चित्रपटाच्या प्रिमीयर शोदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमुळे अटक करण्यात आली होती. अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर त्यांच्या परिवारासह चाहते नाराज झाले होते. अशातच आज अल्लु अर्जुनची सुटका झाल्यानंतर अभिनेता त्याच्या घरी पोहोचला आहे याचदरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Entertainment News
Pushpa 3: 'पुष्पा 3' या दिवशी होणार रिलीज; अल्लू अर्जुनने स्वतःच दिली हिंट

गुरूवारी दुपारी अल्लु अर्जनला त्यांच्या राहत्या घरातून अटक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी अल्लू अर्जुनच्या घराबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी अल्लू अर्जुनला हैद्राबाद येथील चंचलगुडा कारागृहात आणले होते. आज अल्लूची सुटका झाली असून अल्लू अर्जुन त्याच्या घरी पोहोचला आहे.

सोशल मिडिया ट्विटरवर अर्जुनचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अर्जुन घरी पोहचल्यानंतर त्याची पत्नी धावत येऊन मिठी मारत रडताना दिसते आहे. अर्जुनची छोटी मुलगी देखील सोबत आहे. सोशल मीडियावर याचदरम्यानचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

अटक करण्यापूर्वी देखील अर्जुनच्या परिवराचा व्हिडीओ समोर आला होता. यामध्ये काळजीत असणाऱ्या पत्नीला अर्जुनने तिला कपाळावर किस करत तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्जुन पत्नीला भेटून नंतरच पोलिसांबरोबर गेला. यानंतर आज सकाळी पुन्हा घरी परतल्यानंतर स्नेहा मुलीला घेऊन घट्ट मिठी मारताना दिसत आहे. यावेळी देखील ती इमोशनल झालेली दिसली.

Entertainment News
Saatvya Mulichi Saatvi Mulgi: 'आई कुठे काय करते' नंतर झी मराठीवरील लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

पुष्पा 2 रिलीज होण्यापूर्वी हैदराबादमध्ये चित्रपटाचा प्रिमीयर शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी अल्लू अर्जुन देखील उपस्थित राहणार यामुळे चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. याचदरम्यान चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. महिलेचा मुलगा देखील गंभीर अवस्थेत रूग्णालयात आहे. याप्रकरणी कुटुंबियानी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. शुक्रवारी अल्लू अर्जुनला पोलिसांना अटक केली. काल झालेल्या अटकेत अल्लु अर्जूनला १४ दिवसांची न्यायालयीने कोठडी देखील सुनावण्यात आली. या निर्णयाविरोधात अल्लू अर्जुनने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर अल्लू अर्जुनला जामीन मंजूर करण्यात आला. मात्र जामीन मंजूर होऊनही एक रात्र अल्लू अर्जुनने तुरूंगात काढली आहे. त्यानंतर आज सकाळी अल्लू अर्जुन तुरूंगातून बाहेर आला आहे.

Entertainment News
Kiran- Vaishnavi Wedding: वैष्णवी होणार किरणची नवरी; हातावर रंगली मेहंदी; Video पाहा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com