बिग बॉसच्या घरात मारामारी
घरातील सदस्याला बिग बॉसने काढले बाहेर
नेटकऱ्यांचाही प्रचंड संताप
'बिग बॉस २०' च्या घरात तुफान राडा पाहायला मिळत आहे. घरात दोन सदस्यांमध्ये मारामारी होते. घरातील दुसरा वाईल्ड कार्ड स्पर्धक नकुल ढुल आणि गुल्लू (कुशल तन्वर) यांच्यात शारीरिक झटापट झाल्यामुळे घरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काझी तौकीर आणि स्काउटओपी (ScoutOP) यांच्या वादातून सुरुवात होते. त्यांच्या भांडणांचे, झटापटीचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
काझी एका जुन्या घटनेबद्दल बोलत होता, ज्यामध्ये त्याने खेळता-खेळता स्काउटच्या कानात थुंकला. त्यावेळी स्काउटने याकडे फारसे लक्ष दिले नाही. परंतु नंतर काझीने गुल्लू आणि माही विजसह इतर स्पर्धकांसोबत या घटनेबद्दल चर्चा केली. नकुलने हे संभाषण ऐकले आणि त्याने स्काउटला त्याबद्दल सांगितले. त्यानंतर नकुलने काझीला जाब विचारला की, त्याने स्काउटच्या पाठीमागे या विषयावर चर्चा का केली, थेट त्याच्याशी का बोलला नाही? यावरून वाद वाढला आणि स्काउटने काझीला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. दरम्यान, गुल्लूने या वादात हस्तक्षेप केला.शाब्दिक वादाचे रूपांतर लवकरच शारीरिक झटापटीत झाले.
नकुल आणि गुल्लू यांच्यातील वाद इतका वाढला की, त्यांच्यात धक्काबुक्की सुरू झाली. नकुल गुल्लूच्या दिशेने धावून गेला आणि झटापटीदरम्यान गुल्लूनेही त्याला प्रत्युत्तर दिले. नकुलने गुल्लूचा कॉलर पकडल्याचेही दिसून आले. इतर स्पर्धकांनी मध्ये पडून त्यांना एकमेकांपासून दूर केले, तेव्हा कुठे हा वाद थांबला. या वादामुळे सीझनमध्ये एक नवीन वळण आले असून, घरातील स्पर्धक या घटनेवरून आणि त्यानंतरच्या परिस्थितीवरून दोन गटांत विभागले गेले आहेत.
या झटापटीनंतर, 'बिग बॉस'ने सर्व स्पर्धकांना लिव्हिंग एरियामध्ये बोलावले आणि या घटनेवर भाष्य केले. त्यांनी स्पर्धकांना आठवण करून दिली की, शारीरिक हिंसाचार हा शोच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आहे. स्पर्धकांना घराबाहेर काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान, 'बिग बॉस'ने सांगितले की, घरातील एका महत्त्वाच्या नियमाचे उल्लंघन झाले आहे. या शारीरिक संघर्षानंतर नकुलला शोमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. 'बिग बॉस २०' च्या घरातून नकुल ढुल बाहेर पडला. सोशल मीडियावर देखील नकुलला बाहेर काढण्याची मागणी केली जात होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.