Brass Cleaning : पितळी देव काळे पडलेत? घरातील या २ गोष्टींनी मिळवा पुन्हा चमक; जाणून घ्या स्वच्छतेची सोपी पद्धत

Sakshi Sunil Jadhav

पितळी देव काळे का पडतात?

हवेतले ऑक्सिजन, ओलावा आणि इतर घटकांच्या संपर्कामुळे पितळेवर काळसर किंवा हिरवट थर जमा होऊ शकतो.

how to clean brass idols

व्हिनेगरचा वापर

व्हाईट व्हिनेगरमधले अॅसिटिक अॅसिड पितळेवरच्या काही प्रकारचे डाग आणि थर कमी करायला मदत करू शकते.

how to clean brass idols

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा आणि थोडं पाणी वापरून तयार केलेली पेस्ट पितळेवरील डाग स्वच्छ करण्यासाठी वापरता येते.

clean brass gods at home

लिंबाचा रस

लिंबातील सायट्रिक ॲसिड काही डाग लगेचच निघतात. मात्र नक्षीकाम असलेल्या किंवा विशेष फिनिशच्या मूर्तींवर काळजीपूर्वक वापर करा.

clean brass gods at home

पेस्ट लावताना घ्या काळजी

मिश्रण मऊ कापडाने हलक्या हाताने लावा आणि आधी मूर्तीच्या न दिसणाऱ्या छोट्या भागावर त्याची चाचणी घ्या.

how to polish brass idols

जोरात घासणे टाळा

कठीण ब्रश, स्टील स्क्रबर किंवा खडबडीत पावडर वापरल्याने पितळेच्या पृष्ठभागावर ओरखडे पडू शकतात.

how to polish brass idols

स्वच्छ पाण्याने धुणे आवश्यक

स्वच्छतेनंतर मूर्तीवर मिश्रणाचे अवशेष राहू नयेत म्हणून योग्य प्रकारे धुवा आणि पाणी पूर्णपणे पुसून टाका.

how to polish brass idols

मूर्ती पूर्णपणे कोरडी करा

पितळी देव सुती किंवा मऊ कापडाने कोरडे केल्याने ओलावा राहण्याची शक्यता कमी होते आणि डाग पुन्हा पडण्यास प्रतिबंध होऊ शकतो.

how to polish brass idols

NEXT : गरम, थंड की डेटॉलचे पाणी... त्वचेसाठी सर्वात बेस्ट कोणतं? वाचून थक्क व्हाल

hot water bath | meta ai
येथे क्लिक करा