Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

Bigg Boss 19 Wild Card Entry : बिग बॉसच्या घरात पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. 'वीकेंड का वार' मध्ये सलमान खान सदस्यांना सरप्राइज देणार आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 19'मध्ये पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.

वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून शाहबाज बदेशा घरात येणार आहे.

'वीकेंड का वार'ला सलमान खान सदस्यांची शाळा घेणार आहे.

'बिग बॉस 19' (Bigg Boss 19) दुसरा 'वीकेंड का वार' पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आज बिग बॉसच्या घरात 'वीकेंड का वार' रंगणार आहे. 'बिग बॉस 19'च्या घरातून कोणाचे पहिले एलिमिनेशन होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. मात्र आता बिग बॉसच्या घरात एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस' या पर्वाची पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस 19' च्या घरात शाहबाज बदेशाची वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. शाहबाज बदेशा हा अभिनेत्री शहनाज गिलचा भाऊ आहे. आज 'वीकेंड का वार' मध्ये शाहबाज बदेशा 'बिग बॉस' च्या घरात एन्ट्री करणार असल्याचे बोले जात आहे. मात्र अद्याप 'बिग बॉस' कडून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही आहे.

बिग बॉस प्रीमियर

बिग बॉस प्रीमियरच्या दिवशी शाहबाज बदेशाने (Shehbaz Badesha) उपस्थिती लावली होती. शहबाज बदेशा मृदुलसोबत स्टेजवर देखील दिसला होता. मतांच्या कमतरतेमुळे प्रीमियरच्या वेळी शाहबाज बदेशाला घरात प्रवेश मिळाला नाही आणि मृदुलने घरात एन्ट्री घेतली. तेव्हापासून सोशल मीडियावर शाहबाज बदेशाच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीची चर्चा पाहायला मिळत आहे. तसेच सोशल मीडियावर तान्या मित्तलचा एक्स प्रियकर बलराज सिंह वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याची चर्चा देखील आहे.

'बिग बॉस 19'मध्ये घरातून बाहेर जाण्यासाठी पाच स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. यात अवेज दरबार, मृदुल तिवारी,कुनिका सदानंद,तान्या मित्तल आणि अमाल मलिक यांचा समावेश आहे.'बिग बॉस'च्या घरातून या आठवड्यात कोण बाहेर जाणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vivah Muhurat 2026 Date: सनई चौघडे वाजणार! २०२६ मध्ये लग्नासाठी ५९ शुभ मुहूर्त, आताच तारखा बघून घ्या...

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या चिखलदरा नगरपरिषदची निवडणूक रद्द होण्याची शक्यता

Famous Director Death : प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन, ५३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Political News : शिंदेंचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच दादांनी पळवला, भोरमध्ये महायुतीत संघर्ष टोकाला

Today Gold Rate : सोन्याचे भाव अचानक बदलले; एका दिवसात दराने पलटली बाजी; आजचा एक तोळ्याचा भाव किती?

SCROLL FOR NEXT