
पाकिस्तान प्रत्येक गोष्टीमध्ये भारताशी तुलना करतोय. तेथील प्रत्येक नेता हा पाकिस्तान कसा भारतापेक्षा महान देश आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात. इतकेच काय पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ सुद्धा त्या प्रयत्नात आहेत. त्यांनीही एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तान भारतापेक्षा किती महान आहे, हे सांगितलं.
सोशल मीडियावर शाहबाज यांचे एक विधान वणव्यासारखे व्हायरल होत आहे. प्रगतीच्या बाबतीत पाकिस्तान लवकरच भारताला मागे टाकेल. त्यांचे विधान खोटे ठरल्यास आपण आपले नाव बदलू, असं विधान शाहबाज शरीफ यांनी केलंय. पाकिस्तानमध्ये एका मोठ्या रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले की, जर आपण भारताला मागे सोडले नाही तर माझे नावही शहबाज शरीफ राहणार नाही. पाकिस्तानला एक महान राष्ट्र नक्कीच करू आणि भारताचे पुढे आपल्या देशाला नेऊ.
पाकिस्तान भविष्यात महान बनले आणि देशात समृद्ध होईल, असंही पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणालेत. परंतु मात्र प्रत्येक वेळी त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. यावेळीही शाहबाज शरीफ यांनी असे वक्तव्य केल्याने सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जात आहे, अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत ज्यात शाहबाज शरीफ यांच्यासाठी नवीन नावे सुचवली जात आहेत. एकीकडे पाकिस्तान लवकरच भारताला मागे टाकेल, असा दावा शाहबाज शरीफ करत आहेत. तरी दुसरीकडे देशाची आकडेवारी मात्र उलट परिस्थिती आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था कर्जात बुडाली आहे, चीनवरील अवलंबित्व दिवसेंदिवस वाढत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.