Param Sundari vs Baaghi 4 : सिद्धार्थ मल्होत्रा अन् टायगर श्रॉफमध्ये कांटे की टक्कर, 'बागी ४'नं ओपनिंग डेलाच केली बक्कळ कमाई

Param Sundari vs Baaghi 4 Box Office Collection : 'परम सुंदरी' आणि 'बागी 4' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमावला, जाणून घेऊयात.
Param Sundari vs Baaghi 4 Box Office Collection
Param Sundari vs Baaghi 4SAAM TV
Published On
Summary

'बागी 4' चित्रपट काल (5 सप्टेंबर)ला रिलीज झाला.

टायगर श्रॉफचा 'बागी 4' सिद्धार्थ मल्होत्राच्या 'परम सुंदरी'ला तगडी टक्कर देत आहे.

'बागी 4'ने पहिल्याच दिवशी कोट्यवधींचा व्यवसाय केला आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) 'बागी 4' (Baaghi 4) आणि सिद्धार्थ मल्होत्राचा ( Sidharth Malhotra ) 'परम सुंदरी' (Param Sundari) चित्रपट एकमेकांना तगडी टक्कर देताना दिसत आहेत. टायगर श्रॉफचा 'बागी 4' चित्रपट काल (5 सप्टेंबर)ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'परम सुंदरी' रोमँटिक - कॉमेडी ड्रामा 29 ऑगस्टला रिलीज झाला आहे. दोन्ही चित्रपटांचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'बागी 4' बॉक्स ऑफिस कलेक्शन

'बागी 4' ए. हर्ष दिग्दर्शित चित्रपट आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'बागी 4' 200 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. 'बागी 4'ने ओपनिंग डेलाच बॉक्स ऑफिवर धुमाकूळ घातला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टायगर श्रॉफच्या 'बागी 4' चित्रपटाने पहिल्या दिवशी 12 कोटींची बंपर कमाई केली आहे.

बागी फ्रँचायझीचा 'बागी 4' सीक्वल आहे. 'बागी 4' ॲक्शन चित्रपट आहे. चित्रपटात टायगर श्रॉफसोबत सोनम बाजवा,संजय दत्त आणि हरनाज संधू हे मुख्य भूमिकेत आहेत. संजय दत्त चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. हरनाज संधू हिने 'बागी 4' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

'परम सुंदरी' बॉक्स ऑफिस कलेक्शन

मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूरच्या 'परम सुंदरी' चित्रपटाने 8 दिवसांत 41.6 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाने आठव्या दिवशी फक्त 1.85 कोटी कमावले आहेत. आता वीकेंडला हे दोन्ही चित्रपट किती कमाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भविष्यात 'बागी 4' सिनेमा 'परम सुंदरी'चा रेकॉर्ड ब्रेक करणार असल्याचे बोले जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'परम सुंदरी' चित्रपटाचे बजेट 40-50 कोटी रुपये आहे. 'परम सुंदरी' चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार जलोटा यांनी केले आहे. चित्रपटाची कथा दिल्लीतील मुलगा आणि केरळच्या मुलीभोवती फिरते. चित्रपटात दोन संस्कृतींचे सुंदर दर्शन पाहायला मिळते.'परम सुंदरी' चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्म पाहायला मिळणार आहे.

Param Sundari vs Baaghi 4 Box Office Collection
Malaika Arora : मलायका अरोरा झाली मालामाल; विकलं मुंबईतील आलिशान अपार्टमेंट, नफा वाचून बसेल धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com