Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

प्रणित मोरे 'Bigg Boss 19'मध्ये पुन्हा येणार? सलमान खान काय म्हणाला? वाचा सविस्तर

Bigg Boss 19-Pranit More : 'बिग बॉस 19' च्या घरातून प्रणित मोरेची एक्झिट झाली आहे. त्याचे हेल्थ अपडेट आणि तो बिग बॉसच्या घरात पुन्हा येणार का? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सलमान खानच्या 'बिग बॉस 19' मधून प्रणित मोरेची एक्झिट झाली आहे.

हेल्थ इश्यूमुळे प्रणित मोरेला बिग बॉसचे घर सोडावे लागले.

प्रणित मोरेची हेल्थ अपडेट समोर आली आहे.

'बिग बॉस 19' (Bigg Boss 19) आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. घरात रोज एक नवीन राडा होताना पाहायला मिळत आहे. नुकताच घरात नॉमिनेशनचा टास्क पार पडला आहे. यात पाच सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. यात फरहाना भट्ट, गौरव खन्ना, नीलम गिरी, अभिषेक बजाज आणि अशनूर कौरचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रीयन भाऊ प्रणित मोरेला (Pranit More) बिग बॉसचे घर सोडावे लागले. वैद्यकिय कारणामुळे प्रणित मोरेची बिग बॉसच्या घरातून एक्झिट झाली.

मीडिया रिपोर्टनुसार, प्रणित मोरेला डेंग्यू झाला आहे. त्यामुळ 2 नोव्हेंबरच्या भागात त्याला घराबाहेर जावे लागले. प्रणित मोरे घराबाहेर गेल्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. तसेच सोशल मीडियावर प्रणित मोरे परत 'बिग बॉस 19' मध्ये येणार का? याची चर्चा रंगली आहे. जेव्हा 'वीकेंड का वार' ला मालती , कुनिका , अशनूर आणि अभिषेकने सलमानला विचारले की, "प्रणित मोरे परत येईल का?" त्यावर सलमान खानने नकारार्थी मान डोलावली.

प्रेक्षकांना प्रणित मोरेला पुन्हा घरात पाहायचे आहे. अशात प्रणितच्या टीमने सोशल मीडियावर एक पोस्ट करून प्रणितचे हेल्थ अपडेट चाहत्यांना दिले आहेत. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, "नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती द्यायची होती की, प्रणितची तब्येत ठीक आहे. आम्ही बिग बॉस टीमच्या सतत संपर्कात आहोत आणि ते आम्हाला त्याच्या बरे होण्याबद्दल माहिती देत ​​आहेत. तुम्ही त्याला दिलेल्या प्रेम, पाठिंब्या आणि प्रार्थनांसाठी खूप खूप धन्यवाद. कृपया त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र."

सोशल मीडियावर चाहते कमेंट्समध्ये प्रणित मोरे बरा झाल्यावर त्याची घरात रि-एन्ट्री व्हावी याची मागणी करत आहे. आता येणाऱ्या भागांमध्ये समजेल की, प्रणित मोरे बिग बॉसच्या घरात येणार की नाही. 'बिग बॉस 19' ची माहिती देणारे सोशल मिडिया पेजवर अशी चर्चा सुरू आहे की, प्रणित मोरेची तब्येत ठीक झाल्यावर त्याला सीक्रेट रुममध्ये ठेवण्यात येईल. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आई शप्पथ सांगतो, कमळाला मतदान करू नका - माजी मंत्री महादेव जानकर

आता हिंदु देवतांचेही 'धर्मांतरण'; काली मातेची केली मदर मेरी

Lucky zodiac signs: शुक्ल पंचमीनिमित्त आजचा शुभ दिवस; कोणत्या राशींना आर्थिक फायदा?

Raj Thackeray: 'मराठी माणसासाठी BMC निवडणूक शेवटची; राज ठाकरेंनी कोणत्या धोक्याचा इशारा दिला?

Rahul Gandhi: राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडवर, बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसच्या ७ बड्या नेत्यांची हकालपट्टी

SCROLL FOR NEXT