Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19 : कुनिकाच्या हातातून गेली कॅप्टन्सी; 'या' सदस्याने मारली बाजी

Bigg Boss 19 Update : 'बिग बॉस 19'मध्ये सत्तापालट पाहायला मिळाली आहे. कुनिकाच्या हातातून कॅप्टन्सी गेली आहे. बिग बॉसच्या घराचा नवीन कॅप्टन कोण, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस 19'मध्ये पहिल्या आठवड्यात एलिमिनेशन झाले नाही.

कुनिकाच्या हातातून बिग बॉसच्या घराची कॅप्टन्सी गेली.

अशनूर कौर बिग बॉसच्या घराची नवीन कॅप्टन बनली.

'बिग बॉस 19'मध्ये (Bigg Boss 19) 'वीकेंड का वार' खूप ड्रामा पाहायला मिळाला. सलमान खानने (Salman Khan ) काही सदस्यांची चांगली शाळा घेतली तर काहींचे कौतुक केले. 'बिग बॉस 19'चा गेम दिवसेंदिवस अधिक मनोरंजक होत जात आहे. आता मात्र बिग बॉसच्या घरात सत्ता पालट झालेली पाहायला मिळत आहे. कुनिकाचे (kunickaa sadanand) कॅप्टन्सी पद गेले आहे. नवीन कॅप्टन कोण, जाणून घेऊयात.

कुनिका यांनी कॅप्टन्सी पद गमावले

बिग बॉसच्या घरात खूप भांडणे पाहायला मिळत आहे. कॅप्टन म्हणून कुनिका सदानंद घरातील घर सांभाळायला अपयशी ठरली. अशा परिस्थितीत बिग बॉसने कुनिकाचे कॅप्टन्सी पद काढून घेतले. बिग बॉसने घरातील सर्व सदस्यांना दोन पर्याय दिले होते. पहिला- घरातील सदस्यांनी कुनिकाला कर्णधार राहू द्यावे आणि दुसरा इम्युनिटी निवडावी. अशावेळी बहुतेक सदस्यांनी कुनिका विरुद्ध मतदान केले आणि तिला कॅप्टन्सी सोडावी लागली.

नवीन कॅप्टन कोण?

बिग बॉस घरातील सदस्यांना एका स्पर्धकाला पुढील नॉमिनेशनपासून वाचवण्यास सांगतो. सदस्यांच्या चर्चांमधून अशनूर (Ashnoor Kaur) आणि अभिषेक हे नाव पुढे येत. जास्त मतांनी अशनूर इम्युनिटी मिळते आणि ती घराची कॅप्टन बनते. या आठवड्यासाठी अशनूर कौर सुरक्षित झाली आहे. आता कॅप्टन अशनूर घर कसे सांभाळणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

पहिल्या आठवड्यात एलिमिनेशन नाही

पहिल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर जाण्यासाठी सात सदस्य नॉमिनेट झाले होते. यात गौरव खन्ना, झीशान कादरी, अभिषेक बजाज, नीलम गिरी, प्रणित मोरे, तान्या मित्तल आणि नतालिया जानोस्जेक यांचा समावेश होता. मात्र बिग बॉसने पहिल्या आठवड्यात एलिमिनेशन केले जाणार नसल्याचे सांगितले आणि सर्व सदस्य सुरक्षित झाले.

'बिग बॉस 19' कुठे पाहाल?

सलमान खानचा (Salman Khan) 'बिग बॉस 19' शो सोमवार ते रविवार रात्री 9 वाजता जिओ हॉटस्टार आणि रात्री 10:30 वाजता कलर्स टिव्हीवर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange patil protest live updates: ५८ लाख नोंदीचा रेकॉर्ड ग्रामपंचायतमध्ये लावण्याच्या मागणीला मान्यता- मनोज जरांगे पाटील

Police Fullform: पोलिस या शब्दाचा अर्थ काय?

Malvan Tourism : मालवणजवळील Top 5 स्पॉट्स; समुद्रकिनारे, किल्ले आणि आकर्षणे

Maratha Reservation: या ताटातलं काढून त्या ताटात द्या हे... चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Tourism: लोणावळा-खंडाळा विसरून जाल! कर्जतजवळ असलेल्या 'या' जागेवर फिरून याच

SCROLL FOR NEXT