Shah Rukh-Rani : "तू पहली तू आखरी..."; शाहरुख खान-राणी मुखर्जीचा रोमँटिक अंदाज, चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव

Shah Rukh Khan-Rani Mukerji Dance Video : शाहरुख खान आणि राणी मुखर्जीचा रोमँटिक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होतोय.
Shah Rukh Khan-Rani Mukerji Dance Video
Shah Rukh Khan-Rani MukerjiSAAM TV
Published On
Summary

शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांनी रोमँटिक डान्स केला आहे.

शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांना एकत्र पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे.

शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांनी "तू पहली तू आखरी..." गाण्यावर डान्स केला आहे.

बॉलिवूडची सुपरकूल जोडी शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि राणी मुखर्जी(Rani Mukerji) कायम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. त्यांनी आजवर अनेक चित्रपट एकत्र केले आहे. त्यांच्या केमिस्ट्रीने तर चाहत्यांना वेड लावले आहे. अलिकडेच शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांना 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. शाहरुख खानला 'जवान' चित्रपटासाठी तर राणी मुखर्जीला 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' या चित्रपटासाठी गौरवण्यात आले.

नुकतीच शाहरुख खानने इन्स्टाग्रामवर एक खास रील शेअर केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शाहरुख खानचा लेक आर्यन खान 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' या सीरिजमधून मनोरंजन सृष्टीत पदार्पण करणार आहे. आपल्या मुलाच्या सीरिजचे शाहरुख खान तगडे प्रमोशन करताना दिसत आहे. चाहते दखील सीरिज पाहण्यासाठी खूप आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहेत. सीरिजचे 'तू पहली तू आखरी' टायटल ट्रॅकवर शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांनी रोमँटिक अंदाजात भन्नाट डान्स केला आहे.

व्हि़डीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राणी मुखर्जीने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची डेनिम जीन्स घातली आहे. मोकळे केस आणि मिनिमल मेकअपमध्ये राणी खूपच सुंदर दिसत आहे. तर शाहरुखने जीन्स आणि निळ्या रंगाचा स्वेटशर्ट घातला आहे. व्हिडीओला शाहरुख खानने हटके कॅप्शन दिले आहे. "शाहरुख खानने कॅप्शनमध्ये लिहिलं की, राष्ट्रीय पुरस्कार...हम दोनो की अधूरी ख्वाहिश पूरी हो गई...अभिनंदन राणी... तू एक राणी आहेस आणि तुला खूप प्रेम..."

शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांनी 'कभी अलविदा ना कहना', 'कुछ कुछ होता है' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता पुन्हा एकदा शाहरुख खान आणि राणी मुखर्जी 'किंग' चित्रपटातून एकत्र येणार आहेत. व्हि़डीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा, लाइक्सचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. लोक त्यांच्या जोडीचे, त्यांच्या केमिस्ट्रीचे कौतुक करत आहे.

Shah Rukh Khan-Rani Mukerji Dance Video
Anjali Raghav : "चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला..."; अंजली राघवने अभिनयाला रामराम ठोकला, पवन सिंहवर संतापली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com