Pyaar Mein Hain Hum : टी-सीरिजकडून खास गिफ्ट! रोमँटिक पावसाळी गाणं "प्यार में है हम" ने चाहत्यांची मने जिंकली

T Series : टी-सीरिजचे नवे गाणे प्यार में है हम पावसातील प्रेमकथेवर आधारित असून, पवन सिंग आणि जरीन खान यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीमुळे हे गाणे प्रेक्षकांना भुरळ घालत आहे.
T Series latest song
Pyaar Mein Hain Hum song news google
Published On

भूषण कुमार यांच्या टी-सीरिजकडून प्रेक्षकांसाठी एक नवे रोमँटिक गाणे सादर करण्यात आले आहे. "प्यार में है हम" या गाण्यात भोजपुरी सुपरस्टार पवन सिंग आणि बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान एकत्र झळकले असून, गाण्याची पार्श्वभूमी पावसाळ्यातील प्रेमकथेवर आधारित आहे. पावसातील रोमँस आणि भावपूर्ण क्षणांचा जादुई अनुभव देणारं हे गाणं प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भावेल.

या गाण्याला संगीतकार आणि गायिका पायल देव यांनी संगीतबद्ध केलं असून, पवन सिंग यांचा आवाज त्यात भावनांचा गहिरा रंग भरतो. गीतकार कुणाल वर्मा यांनी या गाण्याला हृदयस्पर्शी शब्दांनी सजवलं आहे. म्युझिक व्हिडीओची कथा एका फिल्म सेटवर उलगडत जाते, जिथे रिअल आणि रीलच्या सीमेवर एक आगळावेगळा रोमँटिक अनुभव साकारला जातो. जरीन खान साड्यांमध्ये खुलून दिसतात, तर पवन सिंग पुन्हा एकदा आपल्या आवाज आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना भुरळ घालतात.

T Series latest song
Mumbai Local : मुंबईकरांना मोठी भेट! नव्याकोऱ्या 268 एसी लोकल ट्रेन येणार, प्रवास गारेगार होणार!

गाण्याच्या निमित्ताने पवन सिंग यांनी आपला अनुभव सांगताना व्यक्त केलं की, या गाण्याचा भाग होणं त्यांच्यासाठी एक आगळा आनंद होता आणि जरीन खानसोबतचा हा प्रवास त्यांना अधिक खास वाटला. पायल देवसोबत काम करणं त्यांच्यासाठी स्मरणीय ठरलं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. तर जरीन खान यांनी या गाण्याचं शूटिंग पावसाच्या वातावरणात झाल्यामुळे तो अनुभव अविस्मरणीय ठरल्याचं सांगितलं. त्यांच्या मते, पवन सिंग यांच्या आवाजाने या गाण्याला खरी जादू लाभली आहे.

"प्यार में है हम" हे गाणं आपल्या सुरेल धून, भावनिक कथानक आणि पावसाळी रोमँसच्या उत्तम संगमामुळे या हंगामातील सर्वाधिक पसंतीस उतरणारं गाणं ठरेल, अशी अपेक्षा आहे. सध्या हे गाणं टी-सीरिजच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर आणि सर्व प्रमुख म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे.

T Series latest song
Jolly LLB 3 : अक्षय आणि अर्शदला पुणे न्यायालयाचा दणका, 'जॉली एलएलबी ३' वादाच्या भोवऱ्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com