भोजपुरी अभिनेता पवन सिंहने अंजली राघवसोबत गैरवर्तन केले.
अंजली राघवने भोजपुरी इंडस्ट्रीला रामराम ठोकला आहे.
अंजली राघव पवन सिंहवर संतापली आहे.
भोजपुरी अभिनेता पवन सिंह याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात त्याने सहकलाकार अंजली राघवच्या कमरेला भर कार्यक्रमात हात लावला. तिला चुकीचा स्पर्श करतानाचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ज्यामुळे पवन सिंहला ट्रोल करण्यात आले आहे.
अंजली राघव (Anjali Raghav) हे संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध नाव आहे. पवन सिंहने तिला भोजपुरी संगीत व्हिडिओमध्ये काम करण्याची ऑफर दिली. 'सैया सेवा करे' या म्युझिक व्हिडीओ दोघांनी एकत्र केला. या गाण्याच्या प्रमोशनसाठी लखनौमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या मध्यभागी पवन सिंह अंजलीच्या कमरेला स्पर्श करताना दिसला. ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे अंजली राघव यांनी भोजपुरी इंडस्ट्री सोडण्याची घोषणा केली. आता या प्रकरणावर अंजली राघवने आपली प्रतिक्रया दिली आहे.
व्हिडीओमध्ये अंजली म्हणाली, "सार्वजनिक ठिकाणी कोणी मला स्पर्श केला तर, मला आनंद होईल का? जर कार्यक्रमात टॅग दिसत होता तर सर्वांसमोर बोलण्याची किंवा स्पर्श करण्याची काय गरज होती. नंतर पडद्यामागे बोलता आलं असते... त्या क्षणी मी हसून घडलेल्या घटनेकडे दुर्लक्ष केले. नंतर मी माझ्या टीमला विचारले की, खरंच काही अडकलं होते का? त्यावर त्या लोकांनी काही अडकले नसल्याचे सांगितले. मग मला खूप राग आला आणि रडू देखील आले. "
पुढे अंजली म्हणाली, "पवन सिंहला लोक देव मानतात... त्याच्या पाया पडतात... त्यामुळे हे सर्वांसमोर बोलायला मला भीती वाटली. कोणीही मला पाठिंबा देणार नाही असे मला वाटले. कार्यक्रम संपल्यावर मी त्यांच्याशी बोलणार होती. मात्र पवन सिंह कार्यक्रमातूनच निघून गेला. त्यानंतर जेव्हा मी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मला फोन आला. ते मला म्हणाले की, पवन सिंहची पीआर टीम खूप मोठी आणि मजबूत आहे. त्यामुळे हे प्रकरण खूप वाढेल. तुमच्याबद्दल कोणत्याही गोष्टी पसरवतील. त्यामुळे मी शांत होते. कोणत्याही मुलीला तिच्या परवानगीशिवाय स्पर्श करणे चुकीचे आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.