Subodh Bhave : सुबोध भावे यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, बहिणीच्या निधनानंतर केली भावुक पोस्ट

Subodh Bhave Emotional Post : मराठी अभिनेता सुबोध भावे यांनी अभिनेत्री प्रिया मराठे यांच्या निधनानंतर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेता नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊयात.
Subodh Bhave Emotional Post
Subodh Bhave SAAM TV
Published On
Summary

मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन झाले.

प्रिया मराठे या सुबोध भावे यांच्या चुलत बहीण होत्या.

बहिणीच्या निधनानंतर सुबोध भावे यांनी भावुक पोस्ट केली आहे.

मराठी अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe ) यांच्या निधनाने संपू्र्ण मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच कलाकारांना धक्का बसला आहे. नुकतीच मराठी अभिनेते सुबोध भावे यांनी प्रिया मराठे यांच्या निधनानंतर एक भावुक पोस्ट केली आहे. प्रिया मराठे या सुबोध भावे यांच्या चुलत बहिणी होत्या. त्यामुळे भावे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी पोस्टमध्ये काय म्हटले, जाणून घेऊयात.

सुबोध भावे यांची पोस्ट

"प्रिया मराठे

एक उत्तम अभिनेत्री, काही मालिका आणि चित्रपटात माझी सहकलाकार...पण माझ्यासाठी त्याहीपेक्षा महत्त्वाचे नातं तिच्या बरोबर होतं. प्रिया माझी चुलत बहीण... या क्षेत्रात आल्यावर तिने घेतलेली मेहेनत, कामावरची तिची श्रद्धा या गोष्टी खूप कौतुकास्पद होत्या... प्रत्येक भूमिका तिने अतिशय मनापासून आणि समरस होऊन साकारली.

काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सरचे निदान झाले. त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली. नाटक, मालिका या मधून पुन्हा आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांसमोर गेली. पण त्या कॅन्सरने काही तिची पाठ सोडली नाही. "तू भेटशी नव्याने " या आमच्या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला. या संपूर्ण प्रवासात तिचा जोडीदार शंतनू मोघे भक्कमपणे तिच्याबरोबर होता.

माझी बहीण लढवय्या होती, पण अखेर तिची ताकद कमी पडली.

प्रिया तूला भावपूर्ण श्रद्धांजली...

तू जिथे असशील तिथे तुला शांतता लाभावी हीच प्रार्थना...

ओम शांती..."

सोनी मराठी वाहिनीवरील 'तू भेटाशी नव्याने' या मालिकेत प्रिया मराठे आणि सुबोध भावे यांनी एकत्र काम केले आहे. तसेच 2016 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'किरण कुलकर्णी vs किरण कुलकर्णी' मालिकेतही सुबोध भावे आणि प्रिया मराठे एकत्र दिसले.2017साली रिलीज झालेल्या 'ती अनी इतार' चित्रपटात देखील सुबोध भावे आणि प्रिया मराठे यांनी एकत्र काम केले.

Subodh Bhave Emotional Post
Priya Marathe : प्रिया मराठे यांची शेवटची पोस्ट व्हायरल, नवऱ्यासाठी लिहिला होता खास मेसेज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com