Priya Marathe : प्रिया मराठे यांची शेवटची पोस्ट व्हायरल, नवऱ्यासाठी लिहिला होता खास मेसेज

Priya Marathe Last Post : मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन झाले आहे. त्यांची शेवटची पोस्ट कोणती, जाणून घेऊयात.
Priya Marathe Last Post
Priya MaratheSAAM TV
Published On
Summary

मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन झाले आहे.

प्रिया मराठे यांची शेवटची पोस्ट नवऱ्यासोबत आहे.

प्रिया मराठे यांनी नवऱ्यासोबतच्या पिकनिकचे फोटो शेअर केले होते.

मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचे कर्करोगाशी झुंज देत असताना निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रिया मराठे यांनी आजवर अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आजारपणामुळे अभिनेत्री प्रिया मराठे या सोशल मीडियापासून थोड्या दूर होत्या. त्यांची शेवटची पोस्ट पाहूया.

प्रिया मराठे यांची शेवटची पोस्ट

प्रिया मराठे (Priya Marathe) यांनी शेवटची पोस्ट 11 ऑगस्ट 2024ला केली होती. त्यांनी नवऱ्यासोबतच्या पिकनिकचे फोटो शेअर केले होते. प्रिया मराठे आणि शंतनू मोघे (Shantanu Moghe) हे दोघेही जयपूरला फिरायला गेले होते. तेव्हा आमेर किल्ल्यावर काढलेले फोटो प्रिया मराठे यांनी शेअर केले होते.

"किल्ल्याची विशालता आणि त्यातील गुंतागुंत पाहून थक्क झालो..." असे कॅप्शन त्यांनी फोटोंना दिले. प्रिया मराठे यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्या नवऱ्यासोबत निवांत वेळ घालवताना दिसत आहे. निसर्गाच्या सानिध्यात नवऱ्यासोबतचे सुंदर फोटो त्यांनी शेअर केले होते. प्रिया आणि शंतनू दोघेही एकत्र खूप आनंदात दिसत होते.

प्रिया मराठे वैयक्तिक आयुष्य

प्रिया मराठे यांनी 2012 साली अभिनेते शंतनू मोघेशी लग्नगाठ बांधली. प्रिया मराठे यांचा जन्म 23 एप्रिल 1987 रोजी ठाण्यात झाला होता. प्रिया मराठे आणि शंतनू मोघेशे हे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी होती.

प्रिया मराठे यांचे करिअर

प्रिया मराठे यांनी 'या सुखांनो या' मालिकेतून मराठी मालिकाविश्वात पदार्पण केले. तर 'कसम से' मालिकेतून हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात पाऊल ठेवले. 'पवित्र रिश्ता', 'या सुखांनो या', 'बडे अच्छे लगते हैं', 'तू भेटशी नव्याने', 'साथ निभाना साथिया', 'चार दिवस सासूचे', 'तू तिथे मी', 'तुझेच मी गीत गात आहे' अशा अनेक गाजलेल्या मालिका त्यांनी केल्या आहेत.

Priya Marathe Last Post
Priya Marathe Passes Away : मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचं निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com