Bigg Boss 19  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19: बिग बॉस १९चा विनर आधीच ठरला?; घरात झालेल्या भांडणामध्ये 'या' स्पर्धकाने सगळं सांगितलं

Bigg Boss 19 Winner: बिग बॉस १९ शो सुरू होऊन फक्त पाच दिवस झाले आहेत आणि स्पर्धकांचे खरे चेहरे समोर येऊ लागले आहेत. स्पर्धक घरात प्रवेश करताच त्यांच्यात वाद झाला. यामध्ये त्यापैकी एकाने तोच विजेता असल्याचा दावा केला होता.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss 19 Winner: सलमान खान होस्ट करत बिग बॉस १९ हा शो २४ ऑगस्ट रोजी सुरू झाला आहे. यावेळीही टीव्हीपासून ते बॉलिवूड आणि अनेक प्रसिद्ध युट्यूबर्सनी या शोमध्ये प्रवेश केला आहे. शो सुरू होऊन अवघे पाच दिवस झाले आहेत आणि स्पर्धकांचे खरे चेहरे समोर येऊ लागले आहेत. स्पर्धक घरात प्रवेश करताच त्यांच्यात एक मोठ भांडण झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी, अलीकडेच घरात दोन स्पर्धकांमध्ये जोरदार भांडण झाले, ज्यामध्ये एकाने तो या शोचा विजेता होणार असल्याचे म्हटले. चला जाणून घेऊया तो कोण आहे?

झीशानने गौरवला टोमणा मारला

खरं तर, घरात प्रवेश होताच गौरव खन्ना आणि झीशान कादरी यांच्यात खूप भांडण झाले आहे. दोघांमध्ये कधी डाळींवरून तर कधी भांड्यांवरून जोरदार भांडण होत आहेत. अशा परिस्थितीत, जेव्हा झीशानने गौरवला एका गोष्टीवर टोमणा मारला तेव्हा त्याच्या तोंडून निघालेल्या गोष्टीने या सीझनच्या विजेत्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.

गौरवने झीशानला आरसा दाखवला

झीशान कादरी गौरव खन्नाला धक्काबुक्की करत म्हणाला, 'तू या आठवड्यात शोमधून बाहेर पडशील.' गौरवने हे ऐकून अवाक झाला आणि त्याने मोठ्या आत्मविश्वासाने उत्तर दिले आणि म्हणाला, 'जेव्हा मी ट्रॉफी उचलेल तेव्हा तू टाळ्या वाजवत असशील.' या सीझनचा विजेता होण्याबद्दल गौरवचा आत्मविश्वास आता सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण करत आहे की या सीझनचा विजेता आधीच ठरला आहे का?

बिग बॉस १९ मध्ये या स्पर्धकांनी प्रवेश केला

फरहाना भट्ट, गौरव खन्ना, बसीर अली, अशनूर कौर, अवेज दरबार, नगमा मिराजकर, अभिषेक बजाज, तान्या मित्तल, नेहल चुडासमा, अमाल मलिक, आरजे प्रणित मोरे, कुनिका सदानंद, झीशान कादरी, नतालिया जानोस्झेक, नीलम गिरी आणि मृदुल हे बिग बॉस १९ चे स्पर्धक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाला मिळाली एका दिवसाची मुदतवाढ

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाचा भाजप आमदाराने घेतला धसका

Maharashtra Politics : राज्यात मनसेला खिंडार, एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना धक्का

भाजपचा माजी आमदार, तत्कालीन पोलीस अधीक्षक, ९ कॉन्स्टेबलसह १४ जणांना जन्मठेप; २०१८ मध्ये घडलेलं नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT