Box Office Report: गुरुवारी 'महावतार नरसिंह'ने मारली बाजी; पण, 'कुली' आणि 'वॉर २'ची जादू फेल

Box Office Collection Report: गुरुवार चित्रपटांसाठी वाईट दिवस ठरला कारण 'कुली', 'वॉर २' आणि इतर चित्रपटांच्या कलेक्शनमध्ये घट झाली. तर,'महावतार नरसिंह'ने चांगली कमाई केली.
Box Office Collection Report
Box Office Collection ReportSaam Tv
Published On

Box Office Collection Report: सध्या 'कुली', 'वॉर २' आणि 'महावतार नरसिंह' हे चित्रपट थिएटरमध्ये सुरु असून प्रेक्षकांना हे तिन्ही चित्रपट आवडले आहेत. मात्र, गुरुवारी बॉक्स ऑफिसवर चित्रपटांनी फार कमी कलेक्शन केले. सर्व चित्रपटांमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे.जाणून घेऊया चित्रपटांच्या एकूण कलेक्शनबद्दल.

कुली

साउथ सुपरस्टार रजनीकांत अभिनीत 'कुली' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली. पण, ब्लॉकबस्टर ओपनिंगच्या १५ दिवसांनंतर, चित्रपटाने काल आतापर्यंतचा सर्वात कमी कलेक्शन केला आहे. गुरुवारी 'कुली'ने फक्त १.६८ कोटी रुपये कमावले, तर बुधवारी ४.८५ कोटी रुपये कमावले. याशिवाय, 'कुली'च्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत २७०.७८ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटात रजनीकांत व्यतिरिक्त, नागार्जुन अक्किनेनी, सौबिन शाहीर, उपेंद्र, श्रुती हासन आणि सत्यराज चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.

Box Office Collection Report
Toxic Relationship: तुमच्यासोबतही 'या' गोष्टी घडतात का? मग तुम्हीही एका टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये आहात

वॉर २

हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्या 'वॉर २' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त सुरुवात झाली. त्यानंतर चित्रपटाच्या कमाईत थोडीशी घट झाली, परंतु त्याने 'कुली'ला जोरदार टक्कर दिली. 'वॉर २'ने गुरुवारी १.३८ कोटी रुपये कमावले, तर बुधवारी २.५ कोटी रुपये कमावले. 'वॉर २' ने आतापर्यंत १५ दिवसांत २३१.१३ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटात हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर व्यतिरिक्त, कियारा अडवाणी, आशुतोष राणा, अनिल कपूर सारखे कलाकार आहेत.

Box Office Collection Report
Skin Care: चेहऱ्यावरील तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी घरी बनवलेलं 'हे' तेल नक्की ट्राय करा, आठवड्याभरात दिसेल फरक

महावतार नरसिंह

'वॉर २' आणि 'कुली' हे चित्रपट १५ दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले आहेत, तर दुसरीकडे 'महावतार नरसिंह' ने ३५ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांना जोरदार टक्कर दिली. गुरुवारी 'महावतार नरसिंह' ने १.१५ कोटी रुपये कमावले, तर बुधवारी २.२५ कोटी रुपये कमावले. आतापर्यंत, चित्रपटाने ३५ दिवसांत २३८.२५ कोटी रुपये कमावले आहेत. अश्विन कुमार दिग्दर्शित हा चित्रपट भगवान विष्णूच्या नरसिंह अवतारावर आधारित एक अॅनिमेशन चित्रपट आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com