Bigg Boss 19 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19: 'मी टीव्हीचा सुपरस्टार आहे...'; बिग बॉसमध्ये नवा वाद, फरहानाला गौरवने सुनावले खडेबोल

Bigg Boss 19: बिग बॉस १९ च्या नवीन प्रोमोमध्ये गौरव खन्नाची एक नवीन बाजू दाखवण्यात आली आहे. फरहाना भट्टवर गौरव चिडतो आणि म्हणतो मी जिंकल्यावर फरहाना टाळ्या वाजवताना दिसेल.

Shruti Vilas Kadam

बिग बॉस १९ चा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

फरहाना भट्ट आणि गौरव खन्ना यांच्यात जोरदार भांडण

माझ्यासाठी टाळ्या वाजवाल असं गौरव खन्नाने फरहाना भट्टला दिलं तॅलेंज

Bigg Boss 19: बिग बॉस १९ च्या नवीन प्रोमोमध्ये गौरव खन्नाची एक वेगळी बाजू दाखवण्यात आली आहे. घरात शांत असलेला गौरव खन्ना आता फरहानावर रागावलेला दिसला. तो फरहानाला सांगतो की तो जिंकल्यावर फरहाना त्याच्यासाठी टाळ्या वाजवेल. फरहाना भट्ट आणि गौरव खन्ना यांच्यातील भांडण दाखवणारा हा प्रोमोवर सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नीलम आणि तान्या गौरवला चिडवतात

प्रोमोची सुरुवात नीलम आणि तान्या गौरव खन्नाला चिडवताना दिसले. गौरव खन्ना त्यावर खूप रागावतो. गौरव खन्ना तान्या आणि नीलमवर चिडतो आणि मध्येच फरहाना भट्ट भांडणात सामील होतो. यामुळे फरहाना भट्ट आणि गौरव खन्ना यांच्यात जोरदार वाद होतो.

गौरव खन्ना फरहानावर रागावतो.

गौरव खन्ना म्हणतो, "ते काहीही बोलले तरी मी या शोमध्येच राहीन. फरहाना उत्तर देते, "तू कोण आहेस?" गौरव खन्ना म्हणतो, "तूला टेलिव्हिजनची ताकद दाखवतो." फरहाना बोलते, "या टीव्हीच्या सुपरस्टारचे काय होणार नाही" यावर गौरव खन्ना आणखी संतापतो आणि म्हणतो, "मी आहे टीव्हीचा सुपरस्टार. तुम्ही शेवटी उभे राहून माझ्यासाठी टाळ्या वाजवाल. माझ्या सीझनमध्ये होतीस म्हणून तुला ओळखल जाईल."

सोशल मीडिया नेटकरी काय म्हटले

सोशल मीडिया नेटकरीही प्रोमोवर प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, "वाह, जीके." दुसऱ्याने लिहिले, "फरहाना भट्ट सर्वांचे खरे रंग उघड करते." तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, "गौरव खन्ना आग आहे. हा सीझन आधीच त्याच्या नावाने ओळखला जातो."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापूरमध्ये गोकुळच्या २५ जागांसाठी ३०१ इच्छुक

Gold Rate Today : सोन्याचे दर पुन्हा बदलले, १ तोळा खरेदीसाठी किती मोजावे लागणार? वाचा २४,-२२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

Why Black Clothes are Avoided During Puja: पूजेच्या वेळी काळे कपडे घालणे का टाळावे?

Latur : दुष्काळासारख्या गंभीर विषयावर बैठक, अधिकारी मात्र मोबाईलमध्ये व्यस्त; संतापजनक VIDEO समोर

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, 1 ऑक्टोबरपासून पगारात होणार मोठी वाढ

SCROLL FOR NEXT