Famous Actress  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actress : मातृछत्र हरपले! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचे निधन, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Actress Mother Death : प्रसिद्ध अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या आईचे निधन झाले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून अभिनेत्रीने याची माहिती दिली.

Shreya Maskar

बिग बॉस फेम अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर

अभिनेत्रीच्या आईचे निधन

वयाच्या ८३ व्या वर्षी अभिनेत्रीच्या आईने घेतला अखेरचा श्वास

मनोरंजन विश्वातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. 'बिग बॉस १९' फेम अभिनेत्री कुनिका सदानंदच्या आईचे निधन झाले आहे. आईच्या जाण्याने कुनिकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, कुनिका सदानंदची आई कल्याणी सदानंद यांचे निधन ६ ऑक्टोबर २०२६ ला झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीने आईसोबतचे जुने फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळी कमेंट्स करून कल्याणी सदानंद यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कुनिका सदानंदच्या आईवर गोव्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अभिनेत्री कुनिका सदानंदची पोस्ट

"माझी आई, मी तुझ्यावर प्रेम करते तू मला दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद! प्रेम, मार्गदर्शन, स्वप्न पाहण्याचा आत्मविश्वास आणि जगाची हिंमत, दिसणे, व्यक्तिमत्व, आयुष्य मला जे काही देते ते सहन करण्याची शक्ती तू मला दिली. माझ्या प्रिय सम्राज्ञी श्रीमती कल्याणी सदानंद, तुम्ही कायम आपल्या लोकांच्या हृदयात सदैव जिवंत राहाल.मित्र आणि कुटुंबीय तुम्हाला या मजेदार प्रेमळ आनंदी मैत्रीपूर्ण व्यक्ती म्हणून लक्षात ठेवतील, ज्यांच्यासोबत वेळ घालवल्यावर चांगले आणि मोकळे वाटायचे. तुझी भावंडे आणि प्रियजन यांच्याशी पुन्हा एकत्र आल्याचा तुला नक्कीच आनंद होत असेल. आई, तू शांततेत विसाव; पत्नी, आई, बहीण, आजी आणि आयुष्यातील इतर सर्वच नात्यांमधील तुझ्या जबाबदाऱ्या तू अत्यंत प्रेम आणि काळजीपूर्वक पार पाडल्यास..."

कुनिका सदानंदचा बिग बॉसमध्ये सहभाग

सलमान खान होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस १९' चा अभिनेत्री कुनिका सदानंद भाग राहिल्या आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाने अनेक चित्रपट गाजवले आहेत. बिग बॉसच्या घरात त्यांची खिलाडी वृत्तीने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. चाहते आता अभिनेत्रीच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

lemon peel Uses : लिंबाची साल कचरा समजून फेकू नका! झाडांसाठी आणि गार्डनसाठी अशी ठरेल वरदान

Maharashtra News Live Update: राहुल गांधी यांच्यावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंधुदुर्गमध्ये काँग्रेसचे आंदोलन

Nana Patekar Family: लाइमलाइटपासून दूर नाना पाटेकर यांचे कुटुंब; पत्नी आणि मुलगा काय करतात?

Weight Loss : नवरात्रीत फिटनेसचा फंडा, वजन कमी करण्यासाठी रोज किती वेळ गरबा खेळावा?

Bribe Case : DGCA च्या २ बड्या अधिकाऱ्यांना २५०००० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं, मुंबईत CBI ची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT