High Court : मुलीने कुठे राहायचे हा तिचा निर्णय, आई -वडील करू शकतं नाहीत सक्ती; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Allahabad High Court Big Decesion News : सज्ञान मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध पालकांसोबत राहण्यास भाग पाडता येणार नाही, एका प्रकरणात असा महत्त्वपूर्ण निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला.
Allahabad High Court Says Adult Daughter Cannot Be Forced to Live With Parents
Allahabad High Court Says Adult Daughter Cannot Be Forced to Live With ParentsAI Image
Published On: 
Summary
  • सज्ञान व्यक्तीला स्वतःचे निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार

  • स्वतःच्या इच्छेने कुठे आणि कोणासोबत राहायचे हे ठरवण्याच्या अधिकारावर न्यायालयाने भर दिला

  • मुलीला आईवडिलांसोबत राहण्यासाठी पालक जबरदस्ती करू शकतं नाही

पालकांनो आता जर तुमच्या मुलीला तुमच्या सोबत राहायचं नसल्यास तुम्ही तिच्यावर जबरदस्ती करू शकतं नाही. कारण एका घटनेत हाय कोर्टाने असा महत्त्वपूर्ण निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.एखादी व्यक्ती सज्ञान असेल आणि ती स्वतःच्या इच्छेने कुठे व कोणासोबत राहायचे हे ठरवत असेल, तर केवळ ती व्यक्ती मुलगी आहे म्हणून तिच्यावर दबाव आणता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात कलावती यांनी आपली २५ वर्षांची मुलगी पूजा हिला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश द्यावेत आणि तिचा ताबा मिळावा, यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात ‘हेबियस कॉर्पस’ याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी मुलीला न्यायालयात हजर केले.

Allahabad High Court Says Adult Daughter Cannot Be Forced to Live With Parents
Tea Leaves : चहा पिऊन चोथा कुंडीतल्या झाडांना घाला; ८ दिवसात दिसतील 'हे' 6 चमत्कार

सुनावणीदरम्यान न्यायालयाने मुलीशी थेट संवाद साधला. त्यावेळी पूजाने आपण दिल्लीमध्ये स्वतःच्या इच्छेने राहत असल्याचे स्पष्ट केले. तसेच आपल्याला कोणत्याही व्यक्तीने बेकायदेशीरपणे डांबून ठेवलेले नाही, असेही तिने न्यायालयाला सांगितले. आईसोबत परत जाण्याची तिची इच्छा नसल्याचे तिने स्पष्टपणे सांगितले.

Allahabad High Court Says Adult Daughter Cannot Be Forced to Live With Parents
Health Care : ओव्हरथिंक करून वैतागलात का? 6 उपाय करा, आजूबाजूला दुःख फिरकणारही नाही

न्यायमूर्ती संदीप जैन यांनी यावेळेस स्पष्ट केले की, केवळ जन्मदाते आई-वडील आहेत म्हणून कोणत्याही वयात आलेल्या व्यक्तीला इच्छेविरुद्ध एखाद्या व्यक्तीबरोबर राहण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही. त्या व्यक्तीला स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या पसंतीच्या ठिकाणी आणि पसंतीच्या व्यक्तीसोबत राहण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे.” या निर्णयामुळे सज्ञान व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याला आणि स्वतःचे निर्णय घेण्याच्या अधिकाराला न्यायालयाने पुन्हा एकदा महत्त्व दिल्याचे स्पष्ट झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com