'मुन्नाभाई MBBS' फेम बॉलिवूड अभिनेत्याच्या कारचा गोव्यात भीषण अपघात; बाप-लेकाला उडवलं, VIDEO व्हायरल

Munna Bhai MBBS Fame Actor Road Accident : 'मुन्ना भाई एमबीबीएस' फेम अभिनेत्याचा अपघात झाला असून त्याचे गाडीने एका दुचाकीला धडक दिली आहे. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.
Munna Bhai MBBS Fame Actor Road Accident
Fame Actor Road Accidentsaam tv
Published On
Summary

प्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा अपघात

अभिनेत्याच्या गाडीने एका दुचाकीला धडक दिली

दुचाकीस्वाराचे वडील गंभीर जखमी

बॉलिवूड अभिनेता चांगलाच अडचणीत अडकला आहे. अभिनेते अश्विन मुशरन गोव्यातील एका कथित रस्ते अपघातात अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची गाडी वडील आणि मुलगा प्रवास करत असलेल्या दुचाकीला धडकली. ही घटना मडगावमधील कुसमान, केपे येथे दुपारी १२:३० च्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे.

freepressjournalच्या वृत्तानुसार, ही धडक झाली तेव्हा अभिनेते अश्विन मुशरन गाडी चुकीच्या बाजूने चालवत होते. दुचाकीवर बसलेल्या मुलांच्या वडीलांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतरचा एक व्हिडिओही ऑनलाइन समोर आला आहे. या फुटेजमध्ये अश्विन मुशरन आणि त्यांची पत्नी घटनास्थळी जमलेल्या लोकांशी वाद घालताना दिसत आहेत.

अपघाताला कारणीभूत ठरलेल्या नेमक्या परिस्थितीची अद्याप पडताळणी झालेली नाही. वडील आणि मुलगा प्रवास करत असलेली दुचाकी अश्विन मुशरन यांच्या गाडीला धडकली. अभिनेत्यावर वाहतुकीच्या दिशेच्या विरुद्ध गाडी चालवल्याचा आरोप आहे. तथापि, उपलब्ध माहिती ही घटनेनंतर केलेल्या आरोपांवर आधारित आहे. या धडकेमुळे परिसरातील अनेक लोक घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर अश्विन मुशरन, त्यांची पत्नी आणि नागरिक यांच्यात वाद झाला. स्थानिक नेते अमोल काणेकर हे त्या जोडप्याला जाब विचारणाऱ्या लोकांमध्ये होते, असे समजते.

Munna Bhai MBBS Fame Actor Road Accident
Famous Actress : ट्रेनमध्ये कपडे काढले, RPF कर्मचाऱ्यावर हल्ला केला; प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक

अमोल काणेकर यांनी या घटनेबद्दल भाष्य केले असून अपघाताबाबत अनेक आरोप केले आहेत. 'इन गोवा २४x७' (In Goa 24x7) शी बोलताना त्यांनी दावा केला की, धडकेनंतर दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली. अमोल काणेकर यांनी अपघाताच्या तीव्रतेबाबत एक विशिष्ट दावाही केला. त्यांनी आरोप केला की, जखमी व्यक्तीच्या हाडाचा एक तुकडा अश्विन मुश्रन यांच्या गाडीच्या उजव्या बाजूच्या वरच्या टायर फेंडरमध्ये अडकलेला आढळला. या आरोपाची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. पीडित व्यक्तीच्या दुखापतीचे नेमके स्वरूप आणि अपघाताची परिस्थिती अधिकृत प्रक्रियेद्वारे स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

अमोल काणेकर यांच्या मते, अपघातानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली. त्यांनी आरोप केला की, अश्विन मुशरन आणि त्यांच्या पत्नीने जखमी व्यक्तीच्या कुटुंबीयांची किंवा घटनास्थळी उपस्थित लोकांची त्वरित माफी मागितली नाही. त्याऐवजी, त्या जोडप्याने गाडीभोवती जमलेल्या लोकांशी वाद घातला. ऑनलाइन फिरणाऱ्या व्हिडिओमध्ये या वादाचा काही भाग चित्रित झाल्याचे दिसते.

अश्विन मुशरन करिअर

अश्विन मुशरन यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. तसेच त्यांनी टिव्ही प्रोजेक्टही केले आहेत. 'मुन्ना भाई एम.बी.बी.एस.' मध्येही अभिनेत्याने काम केले आहे. त्यांचा सर्वात अलिकडील चित्रपट 'हॅपी पटेल: खतरनाक जासूस' असल्याचे समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com